शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी 2 महिन्यांनी मुंबईत

By admin | Updated: June 25, 2014 02:39 IST

केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर बुधवारी जात आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच केंद्रीय भूपृष्ठवाहतूक  व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर बुधवारी जात आहेत. पण  त्यांनी सार्वजनिक स्वागत सत्कार करू नये, हार - गुच्छे देऊ नयेत, स्वागत कमानी लावू नका, फ्लेक्सबाजी करू नका अशा सूचना प्रदेश भाजपाला दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष व तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या गडकरींच्या या दौ:याला पक्षीय नव्हे, तर शासकीय स्वरूप उरले आहे. मात्र ते पक्ष पदाधिकारी व कार्यकत्र्याना भेटी देणार आहेत.  
शपथविधीनंतर महिनाभर व तत्पूर्वी एक महिना असे तब्बल दोन महिने गडकरी मुंबईत गेलेले नाहीत. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या पाश्र्वभूमीवर ते 25 व 26 रोजी प्रथमच मुंबईत जात आहेत. त्यामुळे या पहिल्या दौ:यात साधेपणा कटाक्षाने पाळला जावा असे आवाहन त्यांनी केल्याचे त्यांच्या येथील कार्यालयीन सूत्रंनी सांगितले.
मुंबईतील त्यांचे दोन दिवसांतील कार्यक्रम पोर्ट ट्रस्टशी संबंधित आहेत. 25 रोजी सकाळी 10 वाजता ते मुंबईत पोहतच असले, तरी दुपारी 3 ते 5 या वेळात सी फेअर डे चा कार्यक्रम शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडिटोरिअममध्ये आहे. सायंकाळी सात वाजता जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमासाठी ताजमहल हॉटेलमध्ये उपस्थित राहणार आहेत. 26 रोजी दुपारी 12 ते दीड या वेळात इंदिरा डॉक येथे पोर्ट ट्रस्टच्या विकासाचे व नव्या प्रकल्पांचे सादरीकरण तर सायंकाळी शिपींग कॉर्पाेरेशनचे सह्याद्री अथितीगृहात सादरीकरण होणार आहे. माध्यमाशी ते संवाद साधणार असून, त्यातून राजकीय विषय दूर ठेवून पोर्ट ट्रस्ट या विषयावर संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील बदलते राजकीय वातावरण, विधानसभा निवडणुका या पाश्र्वभूमीवर ते चाचपणी करतीलही पण जाहीरपणो मुसाफिरी करणारे गडकरी यावेळी मात्र जाहीर समारंभापासून दूर असणार आहेत. मंगळवारी दिल्ली भेटीवर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘त्यांचा राजकीय तसेच पक्षाचा कार्यक्रम ठरलेला नाही.’ (विशेष प्रतिनिधी)