भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा

By Admin | Updated: September 26, 2016 03:41 IST2016-09-26T03:41:20+5:302016-09-26T03:41:20+5:30

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधवांतर्फे ३ आॅक्टोबरला तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

Front for support of Bhujbal | भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा

भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा

नाशिक : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधवांतर्फे ३ आॅक्टोबरला तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
त्यात तळागाळातील ओबीसींनी एकत्र येऊन शासनाला ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन रविवारी बैठकीत करण्यात आले. औरंगाबादरोडवरील जयशंकर गार्डन येथे भुजबळ समर्थक व ओबीसींची बैठक झाली. शासनाने भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई केली असून, त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बैठकीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जि. प. माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आदी उपस्थित होते.
मोर्चासाठी बैठकीत जवळपास १५ लाख रु पये देणग्या जाहीर करण्यात आल्या. देणग्यांपाठोपाठ वाहने व पाण्याची व्यवस्था करण्याचे, मोर्चासाठी लागणाऱ्या वस्तू देण्याचे जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Front for support of Bhujbal