शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुण्यात विविध मागण्यांसाठी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 7:47 PM

मंगळवारी (दि. १२) मुंबई येथील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील वकिल संघटनेचे पदाधिकारी जमणार आहेत.

ठळक मुद्देवकिलांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार

पुणे : देशभरातील न्यायालयांमध्ये बार असोसिएशनसाठी स्वतंत्र  इमारत हवी, वकिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या, वकिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पामध्ये पाच हजार कोटींची तरतूद करण्यात यावी यांसारख्या वकिलांच्या विविध मागण्यांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे  (पीबीए) सोमवारी आंदोलन केले. वकिलांनी दुचाकी रॅली काढून निवासी उप-जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. मंगळवारी (दि. १२) मुंबई येथील आझाद मैदानावर विविध जिल्ह्यातील वकिल संघटनेचे पदाधिकारी जमणार आहेत. त्यानंतर वकिलांच्या या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार राज्यात सोमवारी वकिलांनी आंदोलन केले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत आगस्ते, उपाध्यक्ष अ‍ॅड. रुपेश कलाटे, अ‍ॅड. रवी लाढाणे, सचिव अ‍ॅड. केदार शिंदे, अ‍ॅड. मनिष मगर, खजिनदार अ‍ॅड. सचिनकुमार गेलडा, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. डी. डी. शिंदे, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. एन. डी. पाटील, अ‍ॅड. शिरीष शिंदे यांच्यासह अनेक वकील मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी असोसिएशनतर्फे नवोदित वकिलांना पहिले पाच वर्ष दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, वकिलांच्या निवासस्थानाकरिता कमी मोबदल्यात जागा उपलब्ध करून द्यावी, लीगल सर्विसेस अथोरिटी अ‍ॅक्ट मध्ये सुधारणा करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. वकिलांच्या निवासासाठी सरकारने कमीत कमी किंमतीत जागा उपलब्ध करून द्यावी. लीगल सर्व्हिसेस अ‍ॅथॉरिटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा व दुरुस्ती करणेबाबत, तसेच या कायद्यामध्ये चालणारे कार्यक्रम वकिलांकडून व्यवस्थित चालविण्यात येतील (यामध्ये न्यायाधीश किंवा ज्युडिशियल ऑफिसर यांचा समावेश नसावा) - सर्व कायदे (ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीशांना विविध पदे दिलेली आहे) त्यामध्ये सुधारणा करून सक्षम वकिलांना त्या ठिकाणी नेमता येईल, असे पुणे बार असोसिएशन प्रमुख जिल्हा जिल्हा न्यायाधीश एस. बी. अगरवाल आणि जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस