शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद महाजन ते अजित पवार...; महाराष्ट्राचे राजकारण हादरवून टाकणारे 4 मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:36 IST

महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, २९ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

महाराष्ट्र राजकारणातील एक धडाडीचा नेता तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) बारामती येथे भीषण विमान अपघातात निधन झाले. विमानाच्या लँडिंगदरम्यान झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह पाचही जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांकडे महायुती सरकारमधील एक महत्वाचे केंद्र म्हणून बघितले जात होते. आज हे शक्ती केंद्र हरपले. अजित पवारांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषत: एनसीपी गटांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. खरे तर, अजित पवारांच्या या अपघाती निधनाने, ज्यांच्या अकाली निधनामुळे राज्याची राजकीय समीकरणे बदलली गेली, अशा काही दिग्गज नेत्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

प्रमोद महाजन : भाजपचे 'किंगमेकर' आणि चाणक्य मानले जाणारे महाजन आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना काळाच्या पडद्याआड गेले. ३ मे २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने भाजपचा एक आधुनिक आणि धोरणी चेहरा हरपला.

गोपीनाथ मुंडे :गोपीनाथ मुंडे हे भाजपचे 'चंद्रगुप्त' म्हणून ओळखले जात होते. त्यांनी बहुजन समाजाला भाजपशी जोडले. केंद्रात ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर, ३ जून २०१४ रोजी दिल्लीत झालेल्या कार अपघातात त्यांचे निधन झाले.

विलासराव देशमुख :दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव हे काँग्रेसचा एक मोठा आधार होता. १४ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. काँग्रेससाठी हा एक मोठा झटका होता. तेदेखील एक सर्वसमावेशक नेता होते.

अजित पवार म्हणजे सहकार क्षेत्रातील 'दिग्गज' -६६ वर्षीय अजित पवार यांनी १९९१ पासून सलग सात वेळा बारामतीचे प्रतिनिधित्व केले. सहकारी बँका, साखर कारखाने आणि दूध संघांवर त्यांची मोठी पकड होती. प्रशासकीय कार्यक्षमता आणि धाडसी निर्णयांसाठी ते ओळखले जात. २०२३ मध्ये त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला होता.

तीन दिवसांचा राजकीय शोकया घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, २९ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pramod Mahajan to Ajit Pawar: Four deaths that shook Maharashtra.

Web Summary : Ajit Pawar's sudden demise in a plane crash recalls similar losses of influential leaders like Pramod Mahajan, Gopinath Munde, and Vilasrao Deshmukh. These deaths significantly altered Maharashtra's political landscape. Pawar's death has prompted three days of state mourning.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण