शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचे अंधारलेले वास्तव बदलणारी मैत्री

By admin | Updated: August 3, 2014 01:02 IST

रेड लाईट भागातल्या लहान मुलांची संध्याकाळ ही अनेक जखमांनी भरलेली असते. पोटच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणी नसल्याने त्यांच्यासमोरच सर्रास चालणारा वेश्याव्यवसाय स्वाभाविकपणे मुलांचे भावविश्व

रेडलाईट एरियातील चिमुकल्यांचे भविष्य बदलविणारे दाम्पत्य सुमेध वाघमारे - नागपूररेड लाईट भागातल्या लहान मुलांची संध्याकाळ ही अनेक जखमांनी भरलेली असते. पोटच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणी नसल्याने त्यांच्यासमोरच सर्रास चालणारा वेश्याव्यवसाय स्वाभाविकपणे मुलांचे भावविश्व त्यांच्या कोवळ्या वयातच उद्ध्वस्त करीत जातो. या दुष्टचक्रात त्यांचे भविष्य बंदिस्त होत असलेले पाहून एका संवेदनशील दाम्पत्याला रहावले नाही. या भीषण परिस्थितीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी या दाम्पत्याने ११ वर्षांपूर्वी त्यांना मित्रत्वाचा हात दिला. आज हेच मैत्रीचे नाते कितीतरी चंदा, बानो, आशा, सानिया, नितीन, प्रकाश यांच्यासाठी मोठा आधार बनले. ईसो डॅनियल आणि लीला ईसो या दाम्पत्याने या मुलांसाठी ‘शरणस्थान’ या चॅरिटेबल संस्थेची स्थापना केली. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे ११४ मुले-मुली आहेत. संस्था म्हणजे आधारवडच!मुला-मुलींच्या राहण्याचा, जेवण्याचा आणि शिक्षणाचा खर्च हे दाम्पत्य उचलते आहे. त्यांच्यामध्ये एक नवी आशा निर्माण करीत आहेत. येथील महिलांसाठी ही संस्था म्हणजे मोठा आधारवडच आहे. नागपूरच्या रेड लाईट एरियामध्ये दोन हजारांहून अधिक महिला देहविक्र ीचा व्यवसाय करतात. दहा-बाय दहाच्या कोंदट खोलीत हा व्यवसाय चालतो. प्रत्येक रात्री बळी पडणाऱ्या या मातांच्या माथ्यावरचे छप्परही त्यांच्या मालकीचे नाही. ज्या महिलांना पोटची मुले आहेत त्यांची अवस्था बिकटच. अशा मुलांना या जीवघेण्या चक्रातून बाहेर काढण्याचा पण २००२ मध्ये या दाम्पत्याने घेतला. तो आजही कायम आहे. यावेळी डॅनियल यांनी सांगितले, आम्ही मूळ केरळचे. झारखंड येथील एका स्टील प्लँटमध्ये दोघेही नोकरीवर होतो. मोठ्या भावाच्या मदतीने एकदा नागपुरात येणे झाले. नागपूर आवडले, परंतु रेड लाईट एरियातील वास्तव पाहिल्यावर अंगावर शहारे आले. त्या महिलांना बाहेर काढणे शक्य नसले तरी त्यांच्या मुलांना चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न करण्याची पत्नीने गळ घातली. महिन्याभराची सुटी टाकली. त्यांच्याच वस्तीतील हनुमान मंदिरालगत असलेल्या दोन खोल्या भाड्याने घेतल्या. त्या खोल्यांमध्ये विशेषत: मुलींसाठी शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. आता मागे वळून पहाणे कठीण होते, म्हणून नोकरी सोडली. येथील काही महिलांनी मुले आमच्याचकडे ठेवण्याचा आग्रह धरला. याच परिसरात डॉ. पीयूष तटकरे यांचे बंद असलेले क्लिनीक होते. १०-१२ खोल्याची ही इमारत भाड्याने घेतली. २००३ पासून मुलांच्या निवासासोबतच त्यांच्या भोजनाची आणि शिक्षणाची सोय आम्ही केली. ११४ मुला-मुलींचा सांभाळ करतो आहे. यातील काही मुले शहरातील मोठमोठ्या शाळां महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. या मुलांना या वातावरणापासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत असला तरी यात समाजाचे बळ मिळण्याची गरज आहे. कारण, आजही या वस्तीत लहान मुले मोठ्या प्रमाणावर आहेत. (प्रतिनिधी)