शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सैनिक पुरुषोत्तम पंत कालवश

By admin | Updated: May 29, 2014 00:49 IST

येथील स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम पंत यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी २७ मे रोजी रात्री अमळनेर येथे निधन झाले.

मलकापूर : येथील स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम पंत यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी २७ मे रोजी रात्री अमळनेर येथे निधन झाले. त्यांच्यावर आज २८ मे रोजी सायंकाळी अमळनेर येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मलकापूर येथील मूळ रहिवासी असलेले पुरुषोत्तम पंत यांनी स्वातंत्र्य चळवळीत विविध भूमिका निभावल्या. दहाव्या वर्गात शिक्षण सुरु असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली होती. त्यांचा गोवा छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग होता. या आंदोलनासाठी गेले असता त्यांना पोतरुगीजांनी बेदम मारहाण करुन जेलमध्ये टाकले व त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहीया, जयप्रकाशजी नारायण, अशोक मेहता यांचेसोबतच मलकापूर येथे आणून सोडले होते. सार्वजनिक ठिकाणी सुंदर अक्षरात बोर्ड लावून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी ते सतत झटले. लहान मुलांत व तरुणांत स्वच्छतेची गोडी, व्यायामाची गोडी निर्माण होण्यासाठी ते सतत प्रयत्नशिल असत. इंग्रज शिपाई त्यांच्या मागावार असायचे. त्यामुळे ते स्वत:च्या घरी एक-दोन महिन्यातून एखाद्यावेळी भेटीसाठी येत व निघून जात, मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाही. या प्रांतातून त्या प्रांतात असे पूर्ण भारतभर भ्रमण करीत. त्यांचे संघटन पक्के, मित्र जिवाला जीव देणारे होते. इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी व गुजराती याचा चांगला अभ्यास असल्याने परिचय दांडगा होता. सगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, सामाजिक संघटना आदींशी चांगला परिचय होता. मुलांवर सामाजिक, सांस्कृतिक संस्कार घडविण्यासाठी विशेष भर दिला. त्यांचे जीवन नेहमी संघर्षमय राहिले. वैयक्तीक प्रसिध्दीच्या विरोधाचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या नावाचा लावलेला चौकातला दगड, स्मृतीस्मारक त्यांनी स्वत: तोडला व मला प्रसिध्दी नको असे सांगितले. मदनलालजी धिंग्रा यांची लालसेना (नागपूर) यामध्ये ते सामील झाले होते व त्यांच्या निर्देशानुसार काम करीत असत. स्वतंत्र सैनिकांचा सन्मान करण्यासाठी नायब तहसिलदार आर.जे.सिरसाट, सतीश पाटील व ताडे, ठाणेदार काझी इत्यादी अधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण केले.