शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडीच्या दिवशी विकृताने महिलेच्या ओठाचा चावून पाडला तुकडा

By admin | Updated: March 16, 2017 03:35 IST

धुळवडीच्या दिवशी इमारतीखाली फेरफटका मारत असलेल्या ५० वर्षांच्या महिलेस अडवून एका विकृताने तिच्या ओठांचा चावा घेतला.

मुंबई : धुळवडीच्या दिवशी इमारतीखाली फेरफटका मारत असलेल्या ५० वर्षांच्या महिलेस अडवून एका विकृताने तिच्या ओठांचा चावा घेतला. यात तिच्या ओठांचा तुकडा खाली पडल्याची विचित्र घटना सायन परिसरात घडली. महिलेच्या ओठांवर हिंदुजा रुग्णालयात प्लास्टीक सर्जरी करण्यात आली असून, त्या अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. सायन पोलिसांसह गुन्हे शाखा या विकृत तरुणाचा शोध घेत आहे.सायन परिसरात तक्रारदार महिला गेल्या दोन महिन्यांपासून कुटुंबीयांसोबत राहते. यापूर्वी त्या वडाळा परिसरात राहत होत्या. मात्र तेथील इमारतींचा पुनर्विकास सुरू असल्याने त्या सायन येथे राहण्यास आल्या. त्या गृहिणी आहेत, तर पती एजेंट म्हणून काम करतात. धुळवडीच्या दिवशी दुपारी सव्वा चारच्या सुमारास इमारतीखाली फेरफटका मारून घरी परतत होत्या. त्याचदरम्यान अचानक समोर उभ्या राहिलेल्या तरुणाने त्यांना अडविले. त्यांच्याकडे प्रेमाची मागणी घातली. त्यांना काही समजण्याच्या आतच त्यांच्या ओठांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर कोणीच नसल्याने त्यांचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. विकृताने चुंबनादरम्यान घेतलेल्या चाव्यात त्यांच्या ओठांचा एक तुकडा खाली पडला. त्याही बेशुद्ध झाल्या. कोणी येण्याच्या आतच विकृताने तेथून पळ काढला. स्थानिकांना त्या रस्त्यांवर पडलेल्या दिसतात त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.हिंदुजा रुग्णालयात त्यांच्या ओठांवर प्लास्टीक सर्जरी करण्यात आली. बुधवारी त्या शुद्धीवर आल्या. आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलीस त्यांच्याकडे विचारपूस करीत आहेत. मात्र अजूनही त्या मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. स्थानिक रहिवासी, हॉटेल कामगार, सुरक्षारक्षक यांच्याकडे पोलीस तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती ठोस असे पुरावे लागलेले नाहीत. अनेक संशयितांची धरपकड करण्यात येत आहे. यापैकी काही संशयितांचे फोटो महिलेला दाखविण्यात येत आहेत. या प्रकरणात त्या पूर्वी राहत असलेल्या ठिकाणांतील इसमांचा समावेश आहे का? त्या दिशेनेही अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)