शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

चौपट मोबदला तरीही भूसंपादनाला विरोध!

By admin | Published: June 04, 2015 4:53 AM

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन संपादनाकरिता चौपट भरपाई देणारा कायदा करूनही जमीन संपादनात अडथळे दिसत असल्याने जमीन संपादनाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरील

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन संपादनाकरिता चौपट भरपाई देणारा कायदा करूनही जमीन संपादनात अडथळे दिसत असल्याने जमीन संपादनाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरील अपघातांकरिता गळे काढू नका, असा सज्जड इशारा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिला.मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूरदरम्यान चौपदरीकरणाकरिता आणि इंदापूर ते झाराप या ३६६ कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता लागणारी १,०३० हेक्टर जमीन संपादित करण्याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी बैठक झाली. या वेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार व खासदार, त्याचबरोबर शिक्षणमंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.पनवेल ते इंदापूर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील जमीन संपादनाचा आढावा घेतला असता, किमान ६० एकर जमीन संपादन रखडले  असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी २० एकर जमीन संपादीत होऊ शकते. नॅशनल ग्रीन ट्रॅब्युनलने कर्नाळा पक्षी अभयारण्यातील रुंदीकरणाच्या कामास हिरवा कंदील दिल्याने आणखी २० एकर जमीन ताब्यात आली तरीही १८ ते २० एकर जमीन संपादीत होण्यात अडथळे आहेत. जमीन संपादनाकरिता रेडीरेकनरच्या चौपट दर देऊन बाजारभावाशी साधर्म्य असणारे दर दिले तरीही लोक जमीन देण्यास तयार होत नसल्याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. इंदापूर-झारप या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाकरिता रायगड जिल्ह्यातील ७० कि.मी., रत्नागिरीमधील २१३ कि.मी. व सिंधुदुर्गातील ८२ कि.मी. अशी ३६६ कि.मी. या अंतराच्या महामार्गाचे रुंदीकरण करायचे असून त्याकरिता १०३० हेक्टर दुतर्फा जमीन लागणार आहे. या जमीन संपादनाकरिता २०१२च्या किंमतीनुसार ३६९० कोटी खर्च अपेक्षित आहे. बैठकीस उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी जमीन संपादनाकरिता जमीन मालकांना कोणता दर दिला जाणार याबाबत सुस्पष्टता नसल्याने जमीन संपादनात अडथळे येत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर जमीन संपादनास विरोध करणाऱ्या लोकांचे नेतृत्व करणार असाल तर मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांकरिता गळे काढू नका, अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका, असा इशारा गडकरी व पाटील यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)