बुलढाण्यात अज्ञात वाहनाची चारचाकीला जबर धडक; ४ ठार, ५ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:08 IST2025-09-18T11:06:43+5:302025-09-18T11:08:14+5:30

बुलढाण्यातील मलकापूर येथे अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

Four killed, five injured in unknown vehicle collision with four-wheeler | बुलढाण्यात अज्ञात वाहनाची चारचाकीला जबर धडक; ४ ठार, ५ जण जखमी 

बुलढाण्यात अज्ञात वाहनाची चारचाकीला जबर धडक; ४ ठार, ५ जण जखमी 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मलकापूर (जि. बुलढाणा): अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला.तर पाच जण गंभीररीत्या जखमी आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर चिखली-रणथम नजिक दि.१७ च्या रात्री ११.४० वाजता हि घटना घडली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चारचाकी क्र.एम.एच.४६/एक्स ३१२० या वाहनाने प्रवासी जळगावंकडून नागपूरकडे येत होते.महामार्गावर मलकापूर तालुक्यातील चिखली -रणथम नजिक चारचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.त्यामुळे भिषण अपघात घडला.

‌या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतक व गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.त्यात गंभीर जखमींपैकी चार जणांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले आहे.तर एकाला बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अपघात घडल्यानंतर पोलिसांनी महामार्गावर ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत केली.उशिरा रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले आदींनी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली आहे.पोलीसांनी त्या अज्ञात वाहनाच्या शोधार्थ रात्रीच हालचाली सुरू केल्या आहेत.

या संदर्भात मृतकापैकी चारचाकी चालक साजीद अजीज बागवान वय ३० रा.भुसावळ जि.जळगांव खान्देश अशी एकाची ओळख पटली आहे.तर उर्वरित तीन मृतक महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही. एमआयडीसी पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.मध्यरात्री घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: Four killed, five injured in unknown vehicle collision with four-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.