शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

माजी महसूलमंत्र्यांचे आदेश का रोखले?

By admin | Updated: February 11, 2015 06:37 IST

सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीस सरकारचे राज्य महसूलमंत्री यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या राज्य महसूलमंत्र्याने जारी

मुंबई : सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीस सरकारचे राज्य महसूलमंत्री यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या राज्य महसूलमंत्र्याने जारी केलेले आदेश रोखल्याची बाब मंगळवारी उच्च न्यायालयासमोर आली़ मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टीडीआर तसेच एमआरटीपीच्या काही प्रकरणांत हे आदेश देण्यात आले होते़ याची दखल घेत न्यायालयाने सत्ताधाऱ्यांचे चांगलेच कान उपटले़ सरकार बदलले म्हणून आधीच्या मंत्र्यांचे आदेश कोणत्या कायद्याखाली रोखले गेले हे स्पष्ट झाले पाहिजे़ कारण सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी प्रशासकीय स्तरावर जारी झालेले आदेश हे संविधानिक असतात, असे फटकारत न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना दिले़माजी राज्य महसूलमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने पुण्यातील काही जणांनी याचिका केली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश का जारी होत नाहीत, असा सवाल केला़ त्यावर आधीच्या राज्य महसूलमंत्र्यांच्या आदेशाचा पुनर्विचार सुरू असून, त्याची अंमलबजावणी करू नका, असे आदेश नवीन सरकारच्या राज्य महसूलमंत्र्यानी जारी केले आहेत याचे रीतसर पत्रच २१ नोव्हेंबर २०१४ रोजी जारी केले असून, जुलै २०१४पासून माजी महसूलमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी थांबवल्याचे सरकारी वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले व ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)