शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 21:12 IST

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत संजय पांडे यांनी गुरुवारी(दि.19) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईःमुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू होती. आता आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या उपस्थितीत संजय पांडे यांनी गुरुवारी(दि.19) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मीडियाला संबोधित करताना संजय पांडे म्हणाले की, त्यांना 2004 पासून काँग्रेसमध्ये यायचे होते, पण आता योग्य वेळ आली आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा यावेळी राज्यात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा संजय पांडे यांनी केला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सर्वसामान्यांना घाबरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. यावेळी महायुतीवर (एनडीए) टीका करताना त्यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचेही म्हटले. दरम्यान, संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणत्या मतदारसंघातून संधी दिली जाते, हे पाहणे महत्वाचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे हे मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या जागेवर सध्या भाजपाचा आमदार आहेत. तर, याच मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजूल पटेल यादेखील उत्सुक आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती.  2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत 32 हजार मते घेतली होती. 2009 साली या मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली होती. त्यानंतर 2014 आणि 2019 या काळात भाजपाच्या भारती लव्हेकर या मतदारसंघात निवडून आल्या. आता वर्सोवा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी अटक2009 ते 2017 या कालावधीत NSE कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ED ने जुलै 2022 मध्ये अटक केली होती. पाच महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय पांडेंना डिसेंबर 2022 मध्ये जामीन मिळाला. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच महाराष्ट्राचे डीजीपी राहिले आहेत. संजय पांडे हे शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईVarsha Gaikwadवर्षा गायकवाडmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४