माजी खासदार सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 23:35 IST2019-09-30T23:33:47+5:302019-09-30T23:35:31+5:30

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी सायंकाळी दिल्ली येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Former MP Sudhir Sawant joins Congress | माजी खासदार सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी खासदार सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 सावंतवाडी : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी सायंकाळी दिल्ली येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस महासचिव के वेणुगोपाल, कोकण प्रभारी बी संदीप आदी उपस्थित होते.

दहा वर्षापूर्वी माजी खासदार सुधीर सावंत यांनी काँग्रेसपासून फारकत घेत  बसपा त्यानंतर शिवराज्य पक्ष व अलिकडेच आम आदमी पक्षात  प्रवेश केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू होती, अखेर आज त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: Former MP Sudhir Sawant joins Congress