शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"गृहखातं हातात असल्यानं राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आलीय, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यांवर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नीलेश राणे यांनी प्रतिइशारा दिला आहे.

ठळक मुद्दे'मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत''राष्ट्रवादीवाल्यांकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. पण आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. पण महाराष्ट्रात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, हे लक्षात ठेवा. आज जिथे तुम्ही आहात तिथे उद्या आम्ही असू शकतो, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांच्याबद्दल एक विधान केले होते. यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. 'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत. त्यांच्याकडे कुठलेही व्हिजन नाही. त्यांनी छोट्या समूहांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला', असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले होते. 

दरम्यान, गोपीचंद पडळकरांच्या या विधानावरून राजकीय वातावरण तापले आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गोपीचंद पडळकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा व चोप देण्याचा इशारा दिला होता. यानंतर भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व प्रवीण दरेकर यांनी गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य चुकीचे आहे. त्यांच्या मताचा भाजपाशी संबंध नसल्याचे सांगत ते याप्रकरणी स्पष्टीकरण देतील सांगितले आणि यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यांवर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नीलेश राणे यांनी प्रतिइशारा दिला आहे. 'पडळकरांच्या त्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्यांच्या अंगावर कोणी जाणार असेल तर लक्षात ठेवा. आम्हाला धमक्या देऊ नका. जशास तसे उत्तर देऊ,' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

याचबरोबर, 'मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत,' याची आठवण नीलेश राणे यांनी करून दिली आहे. याशिवाय, 'राष्ट्रवादीवाल्यांकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. पण आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आज जिथे तुम्ही आहात तिथे उद्या आम्ही असू शकतो,' असेही नीलेश राणे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार