काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 25, 2020 01:34 PM2020-09-25T13:34:20+5:302020-09-25T13:43:40+5:30

सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही.

Former minister ram shinde Attacks on maha vikas aghadi Thackeray sarkar government | काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण!

काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण!

Next
ठळक मुद्देठाकरे सरकारला राज्यातील जनतेशी काहीही देणे घेणे नाही, राम शिंदेंचा आरोप केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या - राम शिंदे या सरकारच्या काळात मोठे घोटाळे, राम शिंदेंचा आरोप

अहमदनगर - ठाकरे सरकारला राज्यातील जनतेशी काहीही देणे घेणे नाही. केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या आहे. सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ गेला आहे. मात्र, तरीही रुग्णांना सुविधा देण्यात हे  सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. गव्हाचा घोटाळा असेल, तांदळाचा घोटाळा असेल. कारण केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानतही या सरकारमध्ये राहिली नाही. या सरकारमध्ये समन्वय नाही, असा गंभीर आरोप भाजपा नेते तथा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारवर केला आहे. याच बरोबर त्यांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार का पडू देत नाही? हेदेखील सांगितले.

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर भाजपच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगले समजते, की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सत्तेत आहोत. यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही, सरकार चालवायचे आणि सरकारमध्येच रहायचे. असेच त्यांचे काम सुरू आहे. 

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

राज्यातील विदारक चित्र या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही -
सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. लोकांच्या विकासाचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे पंचनामे आणि दुष्काळ, अशा प्रश्नांवर हे सरकार बोलायलाही तयार नाही. या सरकारला अनेक क्षेत्रात अपयश आले आहे. हे विदारक चित्र या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोष्टींसाठी हे सरकार बनले आहे, त्या दिशेने त्यांना यश येताना दिसत नाही. त्यांच्याकडून कोणताही निर्णय होत नाही,' अशी टीकाही शिंदे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न -
राज्याचे गृहमंत्री म्हणाले, अधिकाऱ्यांनी सरकार पाडाण्याचा प्रयत्न केला. जर अधिकारी सरकार पाडायला निघाले असतील, तर स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. असे होत असेल तर सरकार काय करत आहे? असा सवालही शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. ज्या अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करत नाही. एवढेच नही, तर त्या अधिकार्‍याची नावेही सांगत नाहीत. हा सर्व प्रकार राज्यातील नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

Web Title: Former minister ram shinde Attacks on maha vikas aghadi Thackeray sarkar government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.