लालफितीत अडकला '' आयटीआय '' चा आराखडा          

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 07:00 IST2019-06-02T07:00:00+5:302019-06-02T07:00:06+5:30

राज्यात सध्या एकुण ४१७ शासकीय व ५०२ खासगी आयटीआय संस्था आहेत.

The format of 'ITI' stuck in red zone | लालफितीत अडकला '' आयटीआय '' चा आराखडा          

लालफितीत अडकला '' आयटीआय '' चा आराखडा          

ठळक मुद्देविस्तार आराखडा रखडला : शासकीय आयटीआयच्या साडे तीन हजार जागा कमीसुमारे १ लाख ४० हजार प्रवेश क्षमता, या जागांवर प्रवेशासाठी जवळपास तीन लाख अर्ज

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) विस्तार आराखडा लालफितीत अडकल्याने यंदाही हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. आराखड्यानुसार आयटीआयमध्ये सुमारे ५० हजार प्रवेश क्षमता वाढ प्रस्तावित आहे. उलट यावर्षी नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाने आयटीआयचा अभ्यासक्रम, प्रवेश क्षमतेच्या नियमांमध्ये बदल केल्याने शासकीय आयटीआयमधील सुमारे साडे तीन हजार जागा कमी झाल्या आहे. 
राज्यात सध्या एकुण ४१७ शासकीय व ५०२ खासगी आयटीआय संस्था आहेत. त्यामध्ये सुमारे १ लाख ४० हजार प्रवेश क्षमता आहे. या जागांवर प्रवेशासाठी जवळपास तीन लाख अर्ज येतात. एकीकडे अभियांत्रिकी हजारो जागा रिक्त राहत असताना आयटीआयवर मात्र विद्यार्थ्यांच्या उड्या पडत आहेत. मात्र, प्रवेश क्षमता कमी असल्यान हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. यापार्श्वभुमीवर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) दोन वर्षांपुर्वी शासकीय आयटीआयचा विस्तार आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. त्यामध्ये शासकीय आयटीआय, तांत्रिक विद्यालयांची पुर्नरचना करणे, तुकड्यांमध्ये वाढ, न चालणारे ट्रेड बंद करणे, शिफ्ट वाढविणे आदी बाबींचा समावेश आहे. त्यामुळे शासकीय आयटीआयची ५० हजारांहून अधिक प्रवेश क्षमता वाढणार आहे. 
मागील वषीर्पासूनच या आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार होती. मात्र, विलंब झाल्याने आराखडा प्रत्यक्षात येऊ शकला नाही. यावर्षी तरी हा आराखड्यानुसार जागा वाढतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. पण प्रत्यक्षात जागा वाढण्याऐवजी साडे तीन हजार जागा कमी झाल्या आहेत. आराखड्याला अद्याप शासकीय मान्यता मिळाली नसल्याने जागा वाढल्या नाहीत, असे वरिष्ठ अधिकाºयांनी स्पष्ट केले. 
-------------

शासकीय जागा घटल्या, खासगी वाढल्या
प्रशिक्षण महासंचालनालयाने यावर्षी ट्रेडनुसार प्रवेश क्षमतेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. मागील वर्षीपर्यंत एका तुकडीमध्ये १६, २१ व २६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. आता ही रचना १६, २० व २४ अशी करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय आयटीआयच्या ३ हजार ४४४ जागा कमी झाल्या आहेत. याउलट नवीन संस्था, ट्रेड सुरू झाल्याने खासगी आयटीआयच्या १ हजार २५२ जागा वाढल्या आहेत. त्यामुळे एकुण प्रवेश क्षमतेत यंदा २ हजार १९२ जागांची घट झाल्याचे दिसते. 
---------------------
बारा हजार जागा वाढणार
 विस्तार आराखड्याला अद्याप शासनाची मान्यता मिळालेली नाही. नवीन खासगी व शासकीय आयटीआय किंवा तुकड्या सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे १२ ते १३ हजार प्रवेश क्षमता वाढण्याची शक्यता आहे. या संस्थांची पाहणी लवकरच पुर्ण होऊन त्यांना मान्यता देण्याबाबत निर्णय होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये या जागांचा समावेश केला जाईल.
- अनिल जाधव, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग
------------

आयटीआय प्रवेश क्षमता
आयटीआय - शासकीय - ४१७
खासगी - ५०२
-----------------
एकुण - २०१८ - १,३९,४९२
२०१९    - १,३७,३००
-----------------
विभाग    २०१९                        २०१८
        शासकीय        खासगी        शासकीय        खासगी
अमरावती    १४६८०        २४००        १५३९०        २२६०
औरंगाबाद    १४८४८        ३६३२        १४७४१        ३१७६
मुंबई    १६०६०                     ३७७२        १६१७३        ३५३४
नागपूर    १३५८०        १२९९६        १४७०८        १३२८९
नाशिक    १४०३६        १२८६४        १४७१७        १३२८९
पुणे     १६४१२        १२०२०        १७३३१        १०९९७
-------------------------------------------------------------------
एकुण    ८९६१६        ४७६८९        ९३०६०        ४६४३२

Web Title: The format of 'ITI' stuck in red zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.