शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर

By admin | Updated: February 7, 2015 00:12 IST

सुप्रिया सुळे : केंद्र, महाराष्ट्रातील शंभर दिवसांचा कार्यक्रमही ‘फेल’

सांगली : भाजपच्या नेत्यांनी, शंभर दिवसात विकासाचा डोंगर उभा करतो, अशी खोटी आश्वासने देऊन केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळविली. निवडणुकीच्या कालावधित शंभर दिवसात महागाई कमी करण्यासह परदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या, टोल हटविण्याच्या घोषणा केल्या होत्या. पण, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगलीत आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे त्यांनी जनाधाराचा आदर करून दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. परंतु, सध्या या दोन्ही सरकारचा कारभार पाहिल्यास, त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र सरकारला काम करण्यासाठी जरूर अजून अवधी दिला पाहिजे. त्यांना चांगल्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच मदत करेल. मात्र, शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय होणार असतील, तर रस्त्यावरही उतरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांनी, सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादीचे आमदार भाजप सरकारला जाब विचारतील, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या योजनांचा केंद्राकडून वापरमहाराष्ट्रात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या संपूर्ण स्वच्छता अभियान, इकोव्हिलेज आदी योजना केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार राबवत आहे, हा महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्राकडून या योजना घेताना जशाच्या तशा राबविण्याची गरज होती. परंतु, केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविताना गावांची निवड केली असून त्यासाठी कुठलाही निधी मिळाला नाही. यामुळे कोणतीही ठोस अशी कामे करता येत नाहीत. याबद्दल मोदी यांना पत्रव्यवहार करून कळविले असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.