शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वनअधिकारी, पोलिसांवर दगडफेक

By admin | Updated: December 26, 2014 00:45 IST

जांबोटी ग्रामस्थ संतप्त : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याचे पडसाद

बेळगाव : बेळगाव-जांबोटी-भीमगड अभयारण्यात सोडलेल्या नरभक्षक वाघाने जांबोटी-माजिवडे गावातील अंजना हणबर (वय २३) या महिलेला ठार केल्यानंतर त्या महिलेचे शव शोधण्याची मोहीम सुरू झाली. यादरम्यान वाघाला नियंत्रित करण्यात अपयश आल्याचा आरोप करून संतप्त लोकांनी पोलीस व वन अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले आहेत. कर्नाटकातील चिक्कमंगळूरमधून बेळगावजवळील जंगलात सोडलेल्या नरभक्षक वाघाला स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे गेल्या १८ आॅक्टोबरला चिक्कमंगळूरमधून नरभक्षक वाघ बेळगावातील जांबोटी-भीमगड अभयारण्यात सोडला होता. या वाघाने जनावरे, गायींवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. मात्र काल, बुधवारी जांबोटीजवळील माजिवडे गावाजवळ शेतात मळणी करायला गेलेल्या २२ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून जंगलात पळवून नेऊन ठार केले होते. या महिलेचे शव शोधण्यासाठी वन व पोलीस अधिकाऱ्यांनी काल, बुधवारी रात्रीपासूनच मोहीम हाती घेतली होती. आज, गुरुवारी सकाळी महिलेचे शव माजिवडे जंगलात २ कि.मी. आत नेऊन ठेवले होते. मृत महिलेच्या अंगाचे वाघाने लचके तोडले होते.ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यावर वाघाला नियंत्रित न करता आल्याने सदर महिलेचा जीव गेल्याचा आरोप करीत आमदार आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या ११ डिसेंबरला वाघाला पकडण्याचे आदेश असतानाही वाघ पकडण्यात अपयश आले आहे. बेळगाव शहराजवळ ११ कि.मी. अंतरावर असणाऱ्या व्ही.टी.यु. विद्यापीठातदेखील वाघ दिसला होता. दरम्यान, अंबाडी माधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, वाघाला पकडून म्हैसूर संग्रहालयात सोडण्याचे आदेश ११ डिसेंबरला मिळाले असून, वाघाला पकडण्यासाठी टीम बनविल्या आहेत. वाघाला गोळी घाला, अन्यथा जिवंत पकडून म्हैसूर प्राणी संग्रहालयात सोडा, असे आदेश मिळाले आहेत. मृताच्या वारासदारांना सात लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आमदाराने दिली वनअधिकाऱ्याच्या कानशिलातआज, गुरुवारी दुपारी महिलेचे शव मिळाल्यानंतर मोहिमेदरम्यान जंगलात पोलीस जेवण करीत होते. यावेळी वाघावर नियंत्रण करण्याऐवजी पोलीस आणि वनअधिकारी जेवण करीत आहेत. आमची महिला ठार झाली व वाघाला पकडण्यात अपयश आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस व वनअधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यावेळी काही प्रमणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वनअधिकारी अंबाडी माधव यांनी ग्रामस्थांना आवरायला पोलिसांना लाठीमार करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आमदार अरविंद पाटील यांना राग अनावर झाला आणि आमदार पाटील यांनी अंबाडी माधव यांच्या कानाखाली लगावली. जांबोटी- माजिवडे येथे गुरुवारी जमावाला शांत करताना आमदार अरविंद पाटील, चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी आणि अन्य.