शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 7:00 AM

नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे..

ठळक मुद्देमागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या 

पुणे : राज्यात काही वर्षांपुर्वीच सुरू झालेल्या शिर्डी, कोल्हापुर, नाशिक विमानतळांवरून उड्डाण होणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या विमानतळांवरून देशांतर्गत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची उड्डाणे उंचच उंच होऊ लागली आहेत. प्रामुख्याने शिर्डी व कोल्हापुर विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अनुक्रमे ७ व ४२ पटींनी वाढ झाली आहे. नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणा (एएआय) ने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात सर्वाधिक प्रवाशांची ये-जा मुंबई व पुणे विमानतळावरून होते. त्याखालोखाल नागपुर व औरंगाबाद विमानतळांचा क्रमांक लागतो. अहवालातील आकडेवारीनुसार, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे व औरंगाबाद विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येते. ही घट मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ५.८, १०.१ व ४०.९ टक्के एवढी आहे. एकीकडे या मोठ्या विमानतळांकडे प्रवाशांकडून पाठ फिरविली जात असताना इतर विमानतळांवरील प्रवाशांच्या प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे ३९ हजार ८९८ प्रवाशांनी प्रवास केला. यावर्षी याच कालावधीत तब्बल २ लाख ९३ हजार प्रवाशांनी ये-जा केली. या काळात विमानांच्या ३ हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या. कोल्हापुर विमानतळावरून विमान फेऱ्यामध्ये ११२ वरून १३२४ पर्यंत वाढ झाली आहे. तर प्रवासी संख्येचा आकडा १४३३ वरून तब्बल ६१ हजारांपर्यंत वाढला आहे. नाशिक विमानतळही यामध्ये मागे राहिलेले नाही. नाशिकमधील प्रवाशांची संख्या १२६२० वरून ४६७५६ पर्यंत वाढल्याचे दिसते. तर विमानांच्या फेऱ्या ३४६ वरून १०१४ पर्यंत वाढल्या आहेत. नागपुर, नांदेड, जळगाव विमानतळांवरून विमनांची उ्डाणे वाढू लागल्याने प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे...........शिर्डी, नाशिक व कोल्हापुरमध्ये विमानतळ सुरू होण्यापुर्वी या भागातील प्रवाशांना पुण्यात यावे लागत होते. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा ओघ मोठा असतो. पुर्वी पुण्यात विमानाने येऊन रस्त्याने शिर्डीपर्यंत जावे लागत होते. नाशिक व कोल्हापुरच्या बाबतीतही हीच स्थिती होती. पण विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलू लागले आहे. देशातील विविध शहरांना विमानसेवेद्वारे या शहरांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे थेट या शहरांमध्ये ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे. ---------------------राज्यातील विमानतळांवरील देशांतर्गत प्रवासी वाहतुक (एप्रिल ते सप्टेंबर)                           प्रवासी संख्या                       विमानांची ये-जाविमानतळ          २०१८        २०१९                     २०१८                 २०१९मुंबई        १,७७,६६,९९६    १,६७,३४,२९५          १,१९,९०६          १,१३,५२४नागपूर        १२,६५,८२६    १४,८१,१३२             १०,२८४               ११,१८९पुणे            ४४,४४,०९८    ३९,९६,५७८               २९,६२२              २६,५६४औरंगाबाद    १,७०,१२८    १,००,५१४                  १,८५०                १,०६४जुहू               ७२,६६१        ७८,०८४                  १०,१२३              १०,८७२कोल्हापुर      १,४३३        ६१,०८९                       ११२                 १,३२४जळगाव        १,४९९        २,६७४                       १९४                   १०४शिर्डी            ३९,८९८        २,९३,३०१                 ८०२                  ३,१७२नांदेड            ५३,३७०        ६७,०६९                  ८४८                  १,१०३नाशिक        १२,६२०        ४६,७५६                   ३४६             १,०१४        

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासी