‘राजकारणात लवचिकता समजण्यासारखी, पण उद्धव ठाकरे अशा किती कोलांटउड्या मारणार?’, विधान परिषद आमदारकीवरून भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:48 IST2026-02-08T15:46:34+5:302026-02-08T15:48:15+5:30
Uddhav Thackeray News: पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीसोबत विरोधी पक्षातील महाविकास आघाडीकडूनही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

‘राजकारणात लवचिकता समजण्यासारखी, पण उद्धव ठाकरे अशा किती कोलांटउड्या मारणार?’, विधान परिषद आमदारकीवरून भाजपाची टीका
पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीसोबत महाविकास आघाडीकडूनही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मात्र २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या बंपर जागांमुळे महायुतीचं पारडं येत्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही जड राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत एक आणि विधान परिषदेमध्ये एक-दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. यापैकी विधान परिषदेच्या एका जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून आता भाजपानेउद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
यासंदर्भात समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट भाजपाचे प्रवक्ते म्हणाले की, अवघ्या महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मनसेसाठी महापालिका निवडणुकीत मविआ आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता स्वत:च्या विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांनाच पुन्हा काँग्रेसची मनधरणी करावी लागणार आहे. राजकारणात लवचिकता समजण्यासारखी आहे, पण उद्धव ठाकरे अशा किती कोलांटउड्या मारणार? असा सवालही ऊपाध्ये यांनी विचारल.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना केली होती; पण नंतर त्यांनी राजीनामा दिला नाही. यावेळी ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि मविआ एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल का, हे महत्त्वाचे असेल.
२० विधानसभा सदस्य असलेल्या उद्धवसेनेने राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस वा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर ठाकरे विधान परिषदेवर जाणार असा त्याचा अर्थ असू शकेल. मविआतील पक्षांना राज्यसभा व विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे. त्याचवेळी इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची हे आव्हान भाजपसमोर असेल.