शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

राज्यातून पाच हजार कार्यकर्ते दिल्लीला जाणारः बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 8:58 PM

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

मुंबई- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ डिसेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विशाल भारत बचाओ महारॅलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातून पाच हजार काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.भारत बचाओ रॅलीच्या तयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन येथे आज रॅलीच्या नियोजनाची जबाबदारी दिलेल्या समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिसन ओझा, डॉ. गजानन देसाई, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.या बैठकीत भारत बचाओ रॅलीच्या तयारीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला. राज्यातून जाणा-या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वाहतूक व निवास व्यवस्थेची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार मध्यमवर्गीय, महिला, विद्यार्थी असे सर्वच समाजघटक या सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या विशाल रॅलीला देशभरातून लाखो काँग्रेस कार्यकर्ते येणार आहेत. राज्यातूनही पाच हजार कार्यकर्ते दिल्ली येथे होणा-या भारत बचाओ रॅलीत सहभागी होणार आहेत.