पक्ष मिळताच अजित पवारांकडून पहिले ट्विट; 'राष्ट्रीय अध्यक्ष', राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 08:18 PM2024-02-06T20:18:04+5:302024-02-06T20:18:28+5:30

निवडणूक आयोगाच्या सुनावण्यांना स्वत: शरद पवार उपस्थित राहत होते. अनेक महिने युक्तीवाद सुरु होता. आज अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.

First tweet from Ajit Pawar after getting NCP party; 'National President', Nationalist Congress Party Vs Sharad pawar | पक्ष मिळताच अजित पवारांकडून पहिले ट्विट; 'राष्ट्रीय अध्यक्ष', राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

पक्ष मिळताच अजित पवारांकडून पहिले ट्विट; 'राष्ट्रीय अध्यक्ष', राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे आज निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देऊन टाकले आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे अजित पवारांच्या गोटात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे शरद पवार गोटात प्रचंड शांतता आहे. 

निवडणूक आयोगाच्या सुनावण्यांना स्वत: शरद पवार उपस्थित राहत होते. अनेक महिने युक्तीवाद सुरु होता. आज अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. शिवसेनेसारखाच हा निकाल देण्यात आला आहे. 

अशातच अजित पवार यांनी हा निकाल येताच लगेचच आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या नावाने MahaNCPspeaks वरून पहिले ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे पद नमूद केले आहे. अजित पवारांनी हे ट्विट रिपोस्ट केले आहे.

आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत, असे अजित पवार म्हणाले आहेत. 
 

Web Title: First tweet from Ajit Pawar after getting NCP party; 'National President', Nationalist Congress Party Vs Sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.