ध्वजारोहणाचा मान प्रथमच विद्यार्थिनींना

By Admin | Updated: August 14, 2016 23:07 IST2016-08-14T23:07:57+5:302016-08-14T23:07:57+5:30

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी सोमवारी १५ आॅगस्ट २०१६ रोजी नागपूर महापालिकेच्या सर्व शाळांतील ध्वजारोहण विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात येणार

First time students of flag hoisting take place | ध्वजारोहणाचा मान प्रथमच विद्यार्थिनींना

ध्वजारोहणाचा मान प्रथमच विद्यार्थिनींना

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार बेटी बचाओ, बेटी पढाओ ही अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी सोमवारी १५ आॅगस्ट २०१६ रोजी नागपूर महापालिकेच्या सर्व शाळांतील ध्वजारोहण विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रथमच हा मान विद्यार्थिनींना मिळणार आहे.
महापालिकेच्या १८२ शाळा असून सर्व शाळांत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचे पालकही उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे रीतसर निमंत्रण विद्यार्थिनी व तिच्या पालकांना पाठविण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे महापालिका शाळांत उत्साहाचे वातावण आहे.
आजवर आमदार, महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक यांच्याहस्ते महापालिकांच्या शाळांत ध्वजारोहण करण्यात येत होते. परंतु यावेळी प्रथमच विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांतही उत्सुकता आहे.

Web Title: First time students of flag hoisting take place