For the first time a full-time course in postgraduate education on Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर शिक्षणात पहिल्यांदाच पूर्णवेळ अभ्यासक्रम

छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर शिक्षणात पहिल्यांदाच पूर्णवेळ अभ्यासक्रम

ठळक मुद्दे''पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अ‍ॅज ए नेशन बिल्डर''असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्रासह त्यांची युद्धपद्धती, राष्ट्र उभारणीची संकल्पना, गनिमी कावा, गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य आदी संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या वर्षापासून पूर्ण वेळ अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाने हा अभ्यासक्रम तयार केला, असून ‘पीजी डिल्पोमा इन 'छत्रपती शिवाजी महाराज अ‍ॅज ए नेशन बिल्डर' असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे.
 छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध युद्धनिती अवलंबित स्वराज्याची निर्मिती केली. यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. त्यांचे जीवन चरित्र्य शालेय अभ्यासक्रमात अभ्यासले जातात. चीनच्या ‘सन त्झू’ या सामरिक तज्ञाच्या युद्धनितीचा अभ्यास जगभर केला जातो. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्कृष्ठ नेतृत्व, राष्ट्रनिर्माते म्हणून जगभरात अभ्यासले जातात. मात्र, संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज यांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्यावर पूर्णवेळ अभ्यासक्राची अद्यापही निर्मिती झाली नाही. यामुळे संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी  शिवाजी महाराजांच्या राष्ट्र उभारणीची संकल्पना, राज्य म्हणून विचार,  प्रशासन, युद्धनिती, जगभरातील योद्धांशी तुलनात्कम अभ्यास, गडकिल्ले क्षेत्रभेटी, नौदलाचे प्रणेते आदी विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक वर्षाच्या पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमाची निर्मिती केली. ''पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अ‍ॅज ए नेशन बिल्डर''असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे. यात वरिल सर्व विषय अभ्यासले जाणार आहेत.
यावर्षी पासून या अभ्यासक्रमाला सुरूवात होणार आहे.  कोणत्याही विद्याशाखेच्या पदवी धारकाला या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. जवळपास २० मुलांना पहिल्या वर्षी प्रवेश दिला जाणार आहे. यातील काही जागा बाहेरील देशातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे.
......
 शिवाजी महाराजांचा समग्र अभ्यास या नव्या अभ्यासक्रमातून होणार आहे. कुठल्याही विद्यापीठात हा अभ्याक्रम अद्यापही सुरू झालेला नाही. या अभ्यासक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेने मान्यता दिली आहे. केवळ वर्गापुरता हा विषय मर्यादित नसुन क्षेत्रभेटी, प्रकल्प आदींचा या अभ्याक्रमात समावेश असल्याची माहिती डॉ. विजय खरे यांनी दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For the first time a full-time course in postgraduate education on Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.