पहिले टार्गेट छगन भुजबळ! शरद पवार येवल्यात सभा घेणार; भुजबळांच्या विरोधकांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 13:11 IST2023-07-05T13:10:50+5:302023-07-05T13:11:18+5:30
अजित पवारांनी बंड केल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले असताना कोणता आमदार कोणासोबत हे अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाहीय.

पहिले टार्गेट छगन भुजबळ! शरद पवार येवल्यात सभा घेणार; भुजबळांच्या विरोधकांची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन दिवसांत मोठी फूट पडली आहे. अजित पवारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली आहे. सुमारे ४३ आमदार सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्याच्या कामी लागले आहेत. ९ मंत्र्यांविरोधात अपात्रतेची याचिक विधनसभेत देण्यात आली आहे. आता वर्षभरापूर्वी रंगलेली राजकीय रणधुमाळी पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
अजित पवारांनी बंड केल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले असताना कोणता आमदार कोणासोबत हे अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाहीय. दोन्ही गटांनी स्वतंत्र व्हीप बजावले असल्याने कोणासोबत जावे हेच आमदारांना कळेनासे झाले आहे. आता शरद पवार राज्यभर दौरे करणार आहेत.
येवल्यातील भुजबळांचे एकेकाळी असलेले खंदे समर्थक आत्ताचे विरोधक अँड.माणिकराव शिंदे यांनी आज शरद पवारांची मुंबई येथे भेट घेतली. येवल्यातील छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची महाराष्ट्रातील पहिली सभा मार्केटयार्ड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती अॅड.माणिकराव शिंदे यांनी दिली आहे. लढू आणि जिंकू अशी पवारांच्या सभेची घोषणा असणार आहे, असे देखील शिंदे म्हणाले आहेत.