शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

मेळघाटात वणवा पेटला; मडकी खोऱ्यात शंभर हेक्टर जंगल राख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 5:00 PM

मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धामणगाव गढी राऊंडमधील मडकी बीटमध्ये आग लागली आहे.

चिखलदरा (अमरावती) : उन्हाळा लागताच मेळघाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात वणवा भडकतो. त्याला दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. चिखलदरा नजीकच्या मोथा ते मडकी दरम्यान जंगलात आग लागली आहे. दोन दिवसात जवळपास शंभर हेक्टर जंगलाची राखरांगोळी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धामणगाव गढी राऊंडमधील मडकी बीटमध्ये आग लागली आहे. परतवाडा ते धामणगाव गढी मार्गे चिखलदरा या रस्त्यावरच असलेल्या मडकी गावानजीकच्या जंगलात आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होण्यासोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती वर्तविली जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात जाळरेषेचे काम झाल्यावरही अगदी रस्त्यावरून एक किमी अंतरापर्यंत जंगलात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आगीमुळे घटांग वनपरिक्षेत्र अंतर्गत कामात अनियमितता झाली का, याचा तपास होणे गरजेचे ठरले आहे.

आग विझवण्याचे कार्य सुरू वनकर्मचारी, अंगारी दोन दिवसांपासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी हवेच्या वेगाने जंगल जळत असल्याचे चित्र आहे. बुधवारी दुपारी २ वाजता परिसरात आग विझवताना एकही कर्मचारी आढळून आला नाही. यासंदर्भात संबंधित अधिकाºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. 

चुकीचा फटका घटांग येथून मडकीचे ३५ किलोमीटर आहे. नुकत्याच झालेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प व प्रादेशिक वनविभागाच्या सीमारेषा निर्धारणात चिखलदरा परिक्षेत्रात असलेले मडकी, धामणगाव गढी हे घटांग परिक्षेत्रात टाकण्यात आले. या चुकीचा फटका आगीच्या रूपाने बसल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. दुसरीकडे वनपरिक्षेत्र अधिकाºयांसह वनकर्मचारी परतवाडा, अमरावती येथून ये-जा करीत असल्याने आगीवर त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पMelghatमेळघाटfireआग