The final year examination of the state's agricultural diploma course has been finally cancelled | राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा अखेर रद्द

राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा अखेर रद्द

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवार (दि.३) रोजी पुण्यात कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षातील अंतर्गत परीक्षेचे गुण आणि गेल्या दोन वर्षातील मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर आधारित गुण घेऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील २३० कृषी विद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन विद्यालयातील मधील दहा हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.
राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक शुक्रवार दिनांक कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथा, कृषी परिषदेचे शिक्षण संचालक हरिहर कौसडीकर उपस्थित होते. 
विश्वजीत माने म्हणाले,राज्यातील दोन वर्षे पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच तीन वर्ष तंत्रनिकेतन विभागाचे विद्यार्थी यांची शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार आहे. या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरी विचारात घेऊन उत्तीर्ण केले जाईल. राज्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

-------
साकोली कृषी महाविद्यालय उभारणार
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली होती. त्यानुसार साकोली मध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाला देखील शुक्रवारी मंजुरी दिली. अकोला कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरु करणार आहे.
------
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी याठिकाणी कृषी व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेतला. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू होईल, असे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The final year examination of the state's agricultural diploma course has been finally cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.