शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सहा जिल्ह्यांना पीक विमा हप्त्यात पन्नास टक्के सवलत

By admin | Updated: August 1, 2014 02:24 IST

विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून विशेष सवलत.

राजरत्न सिरसाट/अकोलाराष्ट्रीय पीक विमा योजनेतंर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार कापसाचा पीक विमा काढताना अल्पभूधारक शेतकर्‍यांना एकूण विमा हप्त्याच्या पंचवीस तर इतर भूधारक ांना पन्नास टक्केच रक्कम भरावी लागते. देशात केवळ सहा जिल्ह्यांसाठी या विशेष पॅकेजअंतर्गत ही सवलत असल्याने, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांची अनुकूलता आता वाढली आहे. नैसर्गिक आपत्ती, कोरडा अथवा ओला दुष्काळ पडल्यास पिकांचे प्रचंड नुकसान होते. त्या नुकसानीची दखल शासनस्तरावर तर घेतलीच जाते, पंरतु राष्ट्रीय पीक विमा योजनेतंर्गत शेतकर्‍यांना हमखास नुकसान भरपाईही दिली जाते. त्यासाठीच राष्ट्रीय स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली असून, देशभरात या योजनेला शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु विदर्भात ही योजना रू जविण्यासाठी अधिकार्‍यांना अपेक्षित यश मिळाले नाही. या योजनेत कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, भुईमूग, तीळ व ज्वारी या खरीपातील आठ पिकांचा समावेश करण्यात आला असून, कापूस पिकासाठी अल्पभूधारक शेतकर्‍यांना ७५ टक्के तर इतर भूधारकांना ५0 टक्के सवलत अर्थात एकूण विमा हप्त्याच्या अनुक्रमे २५ व ५0 टक्केच रक्कम शेतकर्‍यांना भरावी लागते. विशेष म्हणजे ,विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ हे सहा जिल्हे सोडून इतर ठिकाणी विमा हप्त्याची ही सवलत केवळ १0 टक्के एवढीच आहे. विशेष पॅकेजअंतर्गत देण्यात येणार्‍या या योजनेत पीकाचा जोखीम स्तर ६0 टक्के आहे. विमा दर १३ टक्के असून, कापूस या पिकाचा सर्वसाधारण विमा हप्ता हेक्टरी २७५६ रू पये आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या विम्याची ७५ टक्के रक्कम अर्थात २0६७ रू पये शासनाकडून भरले जात असल्यामुळे या शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी केवळ ६८९ रू पये एवढा २५ टक्के हप्ता भरावा लागतो. देशात, केवळ विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत विशेष पॅकेजतंर्गत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उशिरा पाऊस सुरू झाल्याने या योजनेची मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक - प्रमोद लहाळे यांनी सांगीतले.*पीक विम्यास मुदतवाढ या खरीप हंगामातील पीक विमा काढण्याची मुदत ३१ जूलै २0१४ रोजी संपणार होती. पावसाची अनिश्‍चितता व उशीरा झालेल्या पेरणीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी या योजनेची मुदत आता १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.