शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा शपथविधी पाहून कसं वाटलं?; पंकजांनी स्पष्ट मत मांडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 20:23 IST

८० तासांच्या सरकारवर पंकजा मुंडेंचं भाष्य

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात एकच राजकीय भूकंप झाला. यावर भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं हा माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा म्हणाल्या. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ८० तासांच्या सरकारवर भाष्य केलं. फडणवीस आणि पवार यांचा २३ नोव्हेंबरला शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी राज्य राष्ट्रपती राजवटीमधून बाहेर पडलं याचा आनंद होता. पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनदेखील केलं. पण या सरकार स्थापनेनं मला फार आनंद झाला नाही. तो माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे गनिमी कावा होता, असं फडणवीस म्हणाले होते. मात्र या गनिमी काव्याची भाजपामधील नेत्यांना कल्पनाच देण्यात आली नव्हती, असं पंकजा यांच्या विधानावरुन समजतं. फडणवीस आणि पवारांच्या शपथविधीबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यामुळे ज्यावेळी मी तो शपथविधी पाहिला, तेव्हा मला धक्का बसला, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. अजित पवारांबद्दल मला फार बोलता येणार नाही, असं पंकजांनी म्हटलं. अजित पवार अतिशय स्पष्टवक्ते आहेत. पण माझा त्यांच्याशी फारसा संबंध आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलू शकत नाही, असं पंकजांनी सांगितलं. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना