भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:13 IST2017-11-17T03:13:21+5:302017-11-17T03:13:58+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत

Fearful of BJP's Rahul Gandhi's popularity, conspiracy to defame Rajiv Gandhi - Sharad Pawar | भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

चंद्रपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे मोदी सरकारवर चढविला.
ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी गांधी कुटुंबीयांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, न्यायालयाने राजीव गांधींना ज्या प्रकरणात क्लिन चीट दिली आहे, अशी प्रकरणे आता उकरून काढली जात आहे. बंद झालेल्या फाईली पुन्हा उकरून काढून अशा कर्तुत्ववान माणसाची प्रतिमा मलीन करण्याचा खटाटोप भाजपा करत आहे, असेही खा. पवार म्हणाले.
‘मी लाभार्थी’ जाहिरातील मजकूर वास्तवाशी धरून नसल्याचा आरोप करत खा. पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत प्रकाशित जाहिरातीचा मजकूर वाचून दाखविला. यामध्ये राज्य शासन किती खोटे बोलते हे सांगितले.
राहुल गांधी आक्रमक -
राहुल गांधी सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहे. त्यांनी यामध्ये सातत्य राखण्याची गरज आहे. गुजरातमध्ये ते पहिल्या दिवसापासून स्टेजवर दिसत आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

Web Title: Fearful of BJP's Rahul Gandhi's popularity, conspiracy to defame Rajiv Gandhi - Sharad Pawar