शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत फराळाच्या पदार्थांवर एफडीएचा पहारा!

By admin | Updated: October 11, 2014 06:01 IST

दिवाळीतील फराळामधील भेसळीला आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यपदार्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे

पुणे : दिवाळीतील फराळामधील भेसळीला आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यपदार्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तेल, तूप, रवा, मैदा, बेसन, मिठाईच्या नमुन्यांची एफडीएकडून तपासणी सुरू आहे. दिवाळीला घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालात भेसळ करण्याचे प्रकार घडतात. दिवाळीच्या तोंडावर निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचे वितरण होऊ नये, यासाठी एफडीएतर्फे दरवर्षी अन्न पदार्थांची तपासणी करण्यात येते. एफडीएने दुधाचे-१२, तेल-८, वनस्पती तूप-७, तूप-३, रवा-४, मैदा-७, बेसन-५, मिठाई-७, नमकीन-१, खवा- २ व मसाल्याचे ३ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती एफडीएचे सह-आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. मिठाईला चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अ‍ॅल्युमिनिअम मानवी आरोग्यास घातक आहे. त्याचा अंश पोटात साठून राहतो. त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे मिठाईच्या निर्मितीवर एफडीएकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.पाच वर्षांपासून केंद्र सरकारने चिनी चॉकलेटवर बंदी घातली आहे. त्यात मेलॅमाईन नावाचा घटक असतो. तो आरोग्यास घातक आहे. चीनमधील उत्पादक बाहेरच्या देशांतच अशा चॉकलेटची विक्री करतात. छुप्या मार्गाने त्याची विक्री होऊ नये यासाठी एफडीए दक्ष आहे. स्थानिक चॉकलेटची विक्री करताना पावती दिली जात आहे की नाही, हेही तपासण्यात येत आहे. एखाद्या चॉकलेटमध्ये अपायकारक घटक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. (प्रतिनिधी)