शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

FB वर पत्नीच्या मैत्रिणीचे खोटे प्रोफाईल बनवून बदनामी केल्याप्रकरणी तरूणाला अटक

By admin | Updated: June 7, 2017 20:36 IST

पत्नीच्याच मैत्रिणीचे खोटे प्रोफाईल तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडून तरूणाला अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 7 - पत्नीच्याच मैत्रिणीचे खोटे प्रोफाईल तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडून तरूणाला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र कुमार जैन ( वय 27 मूळ रा.जशननगर राजस्थान सध्या बोर्डेवस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही पणजी येथे राहाते आणि ती जैन याच्या पत्नीची मैत्रीण आहे. विवाहाला तीन वर्षे झाल्यानंतर पत्नी विभक्त झाली.दोघांना एक मुलगा देखील आहे. मात्र दोघांचा अद्यापही घटस्फोट झालेला नाही. याच मैत्रिणीने पत्नीला नोकरी लावताना तिचे स्टेटस सिंगल दाखविल्याचा त्याला राग आला म्हणून जैन याने या महिलेचे फेसबुकवर खोटे प्रोफाईल तयार केले . त्यावर तिचा आणि तिच्या मित्राचा फोटो टाकून त्याखाली मोबाईल नंबरसहित अश्लील मजकूर टाकला. अचानक महिलेला रात्रीअपरात्री अज्ञात व्यक्तींचे फोन येऊ लागल्याने ती जरा बुचकळ्यातच पडली..एके दिवशी मैत्रिणीच्या मित्राने ते पाहिल्यानंतर त्याला धक्काचबसला आणि त्याने सायबर सेल विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून तरूणाला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी योगेश वाव्हळ, नितीन चांदणे, अस्लम आत्तार, तोसीफ मुल्ला, संतोष जाधव यांनी ही कामगिरी केली.