शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
3
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
4
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
5
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
6
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
7
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
8
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
9
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
10
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
11
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
12
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
13
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
14
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
15
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
16
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
17
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
18
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
19
उत्तराखंडमध्ये वाघाच्या दोन बछड्यांची विषप्रयोग करून निर्घृण हत्या; पंजे कापले, एक गुराखी अटकेत
20
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Fathers Day: "बाबा, मला बिस्कीट नको, चॉकलेट नको, फक्त तुम्ही लवकर घरी या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:00 IST

Happy Fathers Day: फादर्स डे’निमित्त शहरातील सैनिकांच्या मुलांनी आपल्या पित्याला ‘लोकमत’द्वारे खास संदेश दिला.

प्राची पाटील,
लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर: ‘मला माहितेय, तुम्ही देशासाठी मोठे काम करत आहात. पण, बाबा, तुम्ही कधी येणार आहात? लवकर आम्हाला भेटायला या. मला बिस्कीट नको, चॉकलेट नको, मला फक्त तुम्ही पाहिजे’. ‘फादर्स डे’निमित्त शहरातील सैनिकांच्या मुलांनी आपल्या पित्याला ‘लोकमत’द्वारे खास संदेश दिला. आपल्या भावना व्यक्त करताना ही चिमुकली मुले भावुक झाल्याचेही पाहायला मिळाली.

प्रत्येकाच्या आयुष्याचा आधारस्तंभ असतो तो
आई घराचे मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व. प्रत्येकाच्या आयुष्यातला आधारस्तंभ असतो बाबा. पण, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची वेळ फार कमी येते. सीमेवर लढणारा सैनिक बाबा तर ग्रेटच. आपल्या मुलांपासून दूर-दूर राहताना त्याचाही जीव तीळतीळ तुटतो. पण, आपल्या भावनांना आवर घालत सीमेवर तो केवळ देशासाठी प्राणपणाने लढतो. त्यामुळेच आपला बाबा सैनिक असल्याचे त्यांची मुले अभिमानाने सांगतात.

ते जाताना खूप रडू येते 
लेह-लडाख सीमेवर तैनात असलेले जवान समाधान आहेर यांची दुसरीत शिकणारी मुलगी शिवकन्या म्हणाली, ‘माझे पप्पा सैनिक आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो. ते जेव्हा सुटीवर येतात, तेव्हा आम्ही खूप गप्पा मारतो, खेळतो, मजा करतो. पण, जेव्हा ते इथून जातात तेव्हा खूप रडू येते. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.’

चॉकलेट घेऊन लवकर या 
जम्मूमध्ये तैनात जवान प्रवीण साळुंके यांचा चार वर्षांचा मुलगा युवराज निरागसपणे म्हणाला, माझे बाबा फौजी आहेत. ते वाईट लोकांसोबत युद्ध करतात. बाबा, मला चॉकलेट घेऊन तुम्ही लवकर या.

लवकर मला घ्यायला या 
सध्या कोलकात्यामधील पानागड येथे तैनात असलेल्या राजू साळुंके यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा शिवांश म्हणाला, ‘मला बाबांची खूप आठवण येते. ते देशाची सेवा करतात. ते मला फोनवर म्हणाले होते की, मी तुला घ्यायला येईन. पण, बाबा अजून आलेच नाहीत. मला चॉकलेट नको, पण तुम्ही बाबाला सांगा की मला लवकर घ्यायला या. मला त्याच्याबरोबरच जायचे आहे.

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र