शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाही मिळणार उच्चदाब वाहिनीद्वारे वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 18:57 IST

राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरण : आयोगाने दिली परवानगी, उच्चदाब वाहिनीची करावा लागणार खर्चप्रलंबित यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार

पुणे : विद्युत आयोगाने कृषी वाहिनीला उच्चदाब वाहिनीतून वीज पुरवठा करण्यास परवानगी दिल्याने, कृषिवाहिन्या उच्चदाब वाहिनीवर स्थलांतरीत करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित विद्युत पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या प्रणालीद्वारे वीज मिळविण्यासाठी रोहित्र आणि वाहिनीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरुवात झाली असून, काहींचा विद्युत पुरवठा सुरु झाला आहे. डिसेंबर -२०१९ अखेरपर्यंत या शेतकऱ्यांना महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात येईल. या प्रणालीवर सुमारे ५ हजार ४८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र दिले जाणार आहे. त्यामुळे मालकी हक्काची भावना वाढीस मदत होईल. शिवाय अखंडित विद्युत पुरवठ्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होईल. याशिवाय रोहित्र नादुरुस्त होणे, तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी कमी होण्यास मदत होईल.महावितरणने याबाबत आयोगाकडे याचिका सादर केली होती. त्यावर आयोगाने तातडीने सुनावणी घेवून १८ डिसेंबर २०१८ रोजी योजनेस मंजुरी दिली. यापूर्वी,शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वीजपुरवठा देण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. सध्या अस्तित्वात असलेल्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना तसेच प्रलंबित यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या वितरण व्यवस्थेतून विज घेण्यासाठी उच्चदाब वाहिनी व रोहित्राचा खर्च शेतकऱ्यांना स्वत: करावा लागणार आहे. त्यानंतरच महावितरणद्वारे त्यांना नवीन वीजपुरवठा जोडून देण्यात येईल. तसेच, लघुदाब वाहिनीवरुन उच्चदाब वाहिनीवर स्थलांतरित केले जाईल. कृषी पंपधारक शेतकऱ्याचा कुठल्याही कारणास्तव कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झाल्यास, शेतकऱ्याने केलेल्या खर्चाच्या रक्कमेचा परतावा घसारा पद्धतीने दिला जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीelectricityवीज