शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:39 IST

ST Bus Fare Update: दिवाळीसाठी एसटीने केलेली हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

DCM Eknath Shinde on ST Bus Fare Hike: राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरामध्ये १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या २० दिवसांसाठी भाडेवाढ लागू करण्यात आली. यामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे एक हजार ते ११०० कोटीचा महसूल जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागणार होता. त्यामुळे आता सरकारने  एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या तोंडावर १० टक्के भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. दुसरीकडे अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना एसटीच्या भाडेवाढीने सामान्यांना चिंतेत टाकलं होतं. राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार होतं. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

"पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मी यावेळी अपवाद केला पाहिजे असं सांगितलं. पूरपरस्थितीमुळे १० टक्के भाडेवाढ रद्द करावी असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार आता ते परिपत्रक काढत आहेत. त्यानंतर भाडेवाढ रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरुस्त्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. ही वाद साध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता लागू करण्यात येणार होती. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू केली जाणार होती.

यावर्षी धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर रोजी आहे. दरम्यान, शाळांना सुट्टया लवकर पड़त असल्याने आणि काही दिवस आधीच प्रवासी संख्या वाढते. त्यामुळे जादा बसगाड्या १५ ऑक्टोबरपासून चालवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह त्यांचा परतीचा प्रवास लक्षात घेऊन ५ नोव्हेंबरपर्यंत वाढीव बसगाड्या सुरू ठेवण्यात येणार त्यामुळे या काळासाठी भाडेवाढ लागू करण्यात येणार होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Cancels Diwali Bus Fare Hike Amid Flood Relief Efforts

Web Summary : Maharashtra government cancels the 10% Diwali bus fare hike due to flood situation. DCM Eknath Shinde intervened, prioritizing relief for affected citizens. The hike, intended to boost revenue, would have burdened rural passengers during the festive season.
टॅग्स :state transportएसटीEknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईक