विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: September 2, 2015 23:37 IST2015-09-02T23:37:11+5:302015-09-02T23:37:11+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतक-याने संपवली जीवनयात्रा.

The farmer's suicide by poisoning him | विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या

विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या

मोताळा (जि. बुलडाणा): आर्थिक संकटाला तोंड देणे अवघड झाल्यामुळे आलेल्या नैराश्यापोटी मोताळा तालुक्यातील तरोडा येथील लक्ष्मण रामधन कठाडे (वय ४५) या शेतकर्‍याने १ सप्टेंबर रोजी शेतात विष प्राशन केले. उपचारासाठी त्यांना बुलडाणा येथील सरकारी रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतक लक्ष्मण कठाडे यांच्या चार एकर शेतीवर बँक तथा खासगी सावकाराचे दीड ते दोन लाख रूपयाचे कर्ज काढले होते. दुष्काळग्रस्त परिस्थिती उद्भवल्यामुळे एवढे कर्ज कसे फेडावे, ही बाब त्यांनी कुटुंबीयांजवळ मंगळवारी संध्याकाळी बोलून दाखवीली होती. या विवंचनेतच त्यांनी मंगळवारी रात्रीदरम्यान विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीसांनी मर्ग दाखल केला.

Web Title: The farmer's suicide by poisoning him