शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

‘चाय पे चर्चा’ फेम गावात शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: February 25, 2015 02:14 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात

आर्णी (जि़ यवतमाळ) : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्णी तालुक्यातील दाभडी गावात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. विठ्ठल सवाई राठोड (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर लोकसभा आणि भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या दाभडी गावात गत ५ वर्षांत १६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २० मार्च २०१४ रोजी दाभडी गावाला भेट दिली होती. ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून सत्ता मिळाल्यास त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन या कार्यक्रमात त्यांनी दिले होते. ज्या गावातून त्यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे दु:ख दूर करण्याचे आश्वासन दिले होते, त्याच गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. विठ्ठलकडे अडीच एकर शेती असून, त्याच्यावर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकीने हताश झालेल्या विठ्ठलने कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. या गावाला केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी ‘आदर्श संसद ग्राम’मध्ये दत्तक घेण्याचे ठरविले होते. मात्र लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नसल्याने या गावाची निवड होऊ शकली नव्हती. तरीही या गावाचा संपूर्ण विकास करण्याचे अभिवचन गावकऱ्यांना दिले होते. मात्र शेतकरी विठ्ठल राठोडच्या आत्महत्येने दाभडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (प्रतिनिधी)