शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुराची मुलगी चालली जपानला

By admin | Updated: February 11, 2015 00:01 IST

अंजलीला हवाय दानशूरांच्या मदतीचा हात

ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील शेतमजुराच्या मुलीने देशपातळीवरील ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ मधील प्रदर्शनात बहुउद्देशीय कृषी यंत्र बनवत पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. तिची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे ‘सकुरा एक्स्चेंज प्रोगॅ्रम आॅफ जपान’च्या वैज्ञानिक दौऱ्यासाठी सांगली जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. अंजली आनंदा कोकरे असे तिचे नाव. याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.अंजलीने तयार केलेल्या या यंत्रामुळे ठिबक सिंचन पाईप गोळा करणे, केबल वायर गोळा करणे, मका, सूर्यफूल सोलणे, खोबरे खिसणे, नारळ सोलणे, फळे कटिंग करणे, उसाचे डोळे काढणे, कडबा कुट्टी करणे आदी वेगवेगळ्या कामासाठी उपयोग होणार आहे. लोकांची मजुरी, वीज व वेळेची बचत होणार आहे.सध्या ती येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिकत आहे. सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ जपान या दौऱ्यात ती आठवडाभर जपानमधील प्रगत सायन्स व तंत्रज्ञान विद्यापीठे, इन्स्टिट्यूट यांना भेट देणार आहे. येथील विज्ञान व तंत्रज्ञान मार्गदर्शन वर्गात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राज्यातून आणखी २० विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.तिला तत्कालीन जिल्हा परिषद शिक्षिका सुस्मिता पाटील, मुख्याध्यापक सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या निवडीबद्दल कर्मवीर विद्यालय व ऐतवडे बुद्रुक नं. १ सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)अंजलीला हवाय दानशूरांच्या मदतीचा हातअंजली कोकरे हिचे वडील आनंदा कोकरे हे शेतमजूर आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दिल्लीला इन्स्पायर अ‍ॅवॉर्डसाठी येणाऱ्या खर्चासाठी त्यांना अनेक दिव्यातून जावे लागले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने जिद्दीने व कष्टाने शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे हे बहुउद्देशीय बनवून प्रथम क्रमांक पटकाविला. हे यंत्रासाठी जरी जपानसाठी येणाऱ्या खर्चाचा बोजा सरकारने उचलला असला तरी, तेथील खर्चासाठी व भविष्यातील शैक्षणिक खर्चासाठी समाजाने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.