शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बोगस बीटी बियाण्यांच्या मोहात!

By admin | Updated: June 9, 2014 01:18 IST

मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून, तो काहीच दिवसांत विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी बियाण्यांची जोमात खरेदी सुरू केली आहे.

बीजी-३ चा गोरखधंदा जोमात : कृषी विभागाची करडी नजर  जीवन रामावत - नागपूरमान्सून केरळमध्ये दाखल झाला असून, तो काहीच दिवसांत विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी बियाण्यांची  जोमात खरेदी सुरू केली आहे.मात्र त्याचवेळी मोठय़ा प्रमाणात बोगस बीटी बियाणे बाजारात दाखल झाले आहे. यात बीजी-३ (आरआर) या कापूस बियाण्याची जोरदार चर्चा  आहे. बीजी-३ या बियाण्याला अजूनपर्यंत केंद्र सरकार व जेनेटिक इंजिनिअरिंग अँडव्हायझरी कमिटीकडून विक्रीची परवानगी मिळालेली नाही. मात्र  असे असताना या बियाण्याच्या नावाखाली बोगस बीटी बियाण्याची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे.  नागपूर विभागात सोयाबीन व कापसाचे सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे. त्यानुसार यंदा संपूर्ण विभागात सुमारे ३ लाख ७८ हजार ३५0 हेक्टरमध्ये  सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज आहे; शिवाय ३ लाख २४ हजार ७00 हेक्टरमध्ये कापसाची लागवड होणार आहे. यासाठी २ लाख ८३ हजार  ४७0 क्विंटल सोयाबीन व ८ हजार १६८ पाकीट बीटी कापूस बियाणे लागणार आहेत. गत काही वर्षांत शेतकर्‍यांमध्ये बीटी बियाण्यांविषयी फार मोठे  आकर्षण वाढले आहे. यामध्ये बोलगार्ड या कंपनीने आतापर्यंंत बीजी-१ व बीजी-२ हे दोन वाण बाजारात आणले आहेत, शिवाय बीजी-३ संशोधन  प्रक्रियेत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बीजी-१ व बीजी-२ या दोन्ही वाणांची उत्पादन क्षमता अधिक असली तरी त्यावर कोणतेही  तणनाशक मारता येत नाही. त्यामुळे बीजी-३ हे वाण विकसित करण्यात आले आहे. यावर तणनाशकाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असे मानले जात आहे. त्यामुळेच या वाणाला राऊंड ऑफ रेजिस्टंट (आरआर) या  नावानेही ओळखल्या जाते. अलीकडे शेतकर्‍यांमध्ये या बियाण्याची फार मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे.परंतु या बियाण्याच्या विक्रीला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. माहिती सूत्रानुसार सध्या बीजी-३ बियाणे संशोधन व मंजुरी प्रक्रियेत आहे.  त्यामुळे ते खरंच शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे की नाही, यावर कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र काही बियाणे विक्रेते जाणीवपूर्वक या  बियाण्याचा प्रचार करून, त्याची चोरट्या मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. कृषी विभाग अशा विक्रेत्यांचा कसून शोध घेत  आहे. यातच कृषी विभागाने गत दोन दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील बोधली व पुसद येथून बोगस बीटी बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. कृषी  विभागाने यंदा बोगस बीटी बियाण्यांविरुद्ध केलेली ही सर्वांंत मोठी कारवाई मानली जात आहे.