शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 12:09 IST

मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे एकापाठोपाठ एक डावपेच आणि भाजपकडून सत्तास्थापनेसाठी अखेपर्यंत करण्यात आलेले प्रयत्न यामुळे राज्याचे राजकारणात सुमारे एक महिना ढवळून निघाले होते. अखेर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने सरकार स्थापन करून या घडामोडींना ब्रेक लावला. मात्र हे सरकार औटघटकेच ठरेल, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. यावरून भाजप अजुनही प्रयत्नशील असल्याचे देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यावरून समोर आले आहे. 

सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्याच दिवशी विरोधीपक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सत्ताधारी नेत्यांकडून कौतुक झाले. तर काही नेत्यांनी फडणवीसांना टोलेही लगावले. 

मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती. 

दरम्यान विरोधीपक्षनेतेपदी विराजमान झालेल्या फडणवीसांनी सर्व नेत्यांकडून करण्यात आलेल्या अभिनंदनाला उत्तर देताना भुजबळांसह महाविकास आघाडीलाच आव्हान दिले आहे. मी पुन्हा येईन म्हणत भुजबळ तुमच्यासोबत येईल, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे भाजप अजुनही राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यास इच्छूक असून त्यासाठी प्रयत्नशील आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.फडणवीसांच्या या वक्तव्यावरून शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, फडणवीसांनी ऐनवेळी दिलेली ही प्रतिक्रिया असून त्यात काही तथ्य नाही.