Sanjay Raut sanjay gaikwad video: शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासात एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरला झाला. त्यात गायकवाड त्याला बुक्क्यांनी जोरजोरात मारत असल्याचे दिसत आहे. या घटनेवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील खोली क्रमांक १०७ मध्ये जेवण देण्यास सांगितले होते. आमदार निवासातील कँटिनमधील जे जेवण देण्यात आले, ते खराब असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.
वाचा >>अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून आमदार गायकवाड कँटिनमध्ये गेले आणि तिथल्या कर्मचाऱ्याला जाब विचारला. त्याला बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनीही त्याला मारहाण केली.
संजय गायकवाडांची कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ पहा
संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेवरून खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
राऊत म्हणाले, "गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अर्पण! हे चित्र खरे असेल तर आपली यावर काही अॅक्शन आहे काय? तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", असे म्हणत राऊतांनी मारहाणीचा व्हिडीओही रिपोस्ट केला आहे.
आमदार निवासातील या घटनेवरून आमदार संजय गायकवाड आणि सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार असल्याने संजय गायकवाड यांच्यावर काहीही कारवाई होणार नाही, असा सूर सोशल मीडियावर उमटला आहे.