शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीविरूद्धचा गुन्हा निकाली

By admin | Updated: September 30, 2016 15:14 IST

वेबसाईटवर अश्लील व आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ टाकल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री, पॉर्नस्टार सनी लिओनी हिच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा निकाली काढण्यात आला

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ३० -  वेबसाईटवर अश्लील व आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ टाकल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री, पॉर्नस्टार सनी लिओनी हिच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा निकाली काढण्यात आला आहे. चिपळूणमधील शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने तक्रार दिली होती. हे आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडिओ विदेशातून अपलोड झाले असल्यामुळे हा गुन्हा निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चिपळूणमधील रेश्मा लक्ष्मण पवार या शिवसेना कार्यकर्तीने २३ मे २०१५ रोजी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. अश्लिल व्हीडीओ आणि छायाचित्रे वेबसाईटवर टाकून बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने अश्लिलता पसरवली असल्याची तक्रार यातून करण्यात आली होती. सनी लिओन व एका अनोळखी इसमाने एकमेकांच्या संगनमताने ही छायाचित्रे प्रसारित केला असल्याचा आरोपही करण्यात आला होता. चिपळूण पोलीस स्थानकात या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा सायबर सेलकडून हाताळण्यास सुरूवात झाली. सनी लिओनीविरूद्धची याच प्रकाराची तक्रार ठाणे पोलीस ठाण्यातही दाखल झाली होती आणि तेथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ठाणे पोलिसांकडून याबाबत सनी लिओनीची चौकशी करण्यात आली होती. हे व्हिडिओ व छायाचित्र विदेशातूनच अपलोड झाल्याचे तपासात व सनी लिओनी हिच्या चौकशीतून पुढे आले आहे. त्यानंतर झालेल्या सेंट्रल इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या केंद्र शासनाच्या संस्थेने संबंधित वेबसाईटवर बंदी घातली आहे. एकतर ही वेबसाईट परदेशातून हाताळली जाते आणि आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही तक्रार निकाली काढण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गुन्हा निकाली काढून संबंधित प्रकरणाची माहिती ठाणे सायबर सेलकडे पाठवून देण्यात आली आहे. गुन्हा निकाली निघाल्यामुळे अभिनेत्री सनी लिओनीला दिलासा मिळाला आहे.