जाती प्रमाणपत्र तपासणीला मुदतवाढ

By Admin | Updated: June 22, 2014 00:55 IST2014-06-22T00:55:02+5:302014-06-22T00:55:02+5:30

सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मुदतीत जाती प्रमाणपत्र

Extension of Cast Certificate Check | जाती प्रमाणपत्र तपासणीला मुदतवाढ

जाती प्रमाणपत्र तपासणीला मुदतवाढ

जाती पडताळणी समिती : ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नागपूर : सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मुदतीत जाती प्रमाणपत्र तपासण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही. परंतु २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय,अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्र्र मासाठी प्रवेश घेऊ इच्छितात. अशा विद्यार्थ्यांच्या जाती प्रमाणपत्र तपासणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्यासाठी आपले अर्ज संबंधित महाविद्यालयामार्फत संंस्थेच्या प्राचार्याकडे ३० जून २०१४ पर्यत सादर करावयाचे आहेत. शैक्षणिक संस्थेने असे प्रस्ताव संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे ७ जुलै २०१४ पर्यंत सादर करावे. सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी १५ जुलै २०१४ पर्यंत विभागीय जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करावे. समितीने सर्व अर्ज तपासून देण्याची अंतिम तारीख ३०सप्टेंबर २०१४ आहे.
विद्यार्थ्यांनी जाती पडताळणीकरीता संबंधित महाविद्यालयास अर्ज सादर करताना जातीसंबंधीचे आवश्यक ते सर्व शैक्षणिक तसेच महसुली पुरावे जाडावे. तसेच इयत्ता १२ वी ची गुणपत्रिका, वरील अभ्यासक्र मास प्रवेश मिळाल्यास पुरावा (बोनाफाईड सर्टिफिकेट ंिकंवा वरील अभ्यासक्र मासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र) सादर करावे. असे आवाहन जाती पडताळणी समिती क्र. ३ चे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी केले आहे.
वाढीव मुदतीत अर्ज फक्त १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे व जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्र मास प्रवेश घेऊ इच्छितात व त्या संदर्भात आवश्यक पुरावा जोडला आहे, त्यांचेच अर्ज स्वीक ारले जातील. तसेच २०१४-१५ मध्ये १२ वीत शिकणारे व मार्च २०१५ मध्ये १२ वी ची परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज १ आॅगस्ट २ ०१४ पासून स्वीकारले जाणार आहे. तूर्त १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी सादर करू नये, असे आवाहन पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Extension of Cast Certificate Check