शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

जीएसटीच्या बैठकीला मोहन जोशीच गैरहजर, विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 3:26 AM

‘जीएसटी’मुळे नाटकांच्या तिकीट दरात वाढ होईल, अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली.

मुंबई : ‘जीएसटी’मुळे नाटकांच्या तिकीट दरात वाढ होईल, अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली. मात्र, निमंत्रण देऊनही मोहन जोशी या बैठकीला आले नाहीत, असे सांगत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद, साहित्य परिषद, नाट्यनिर्माता महासंघ आदी सांस्कृतिक क्षेत्रातील मातृसंस्थांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत, विनोद तावडे यांना लक्ष्य केले होते. सांस्कृतिक क्षेत्राबाबत सरकारमध्ये कमालीची उदासीनता आहे. तावडे यांच्याकडे अन्य खात्यांचा भार असल्याने या खात्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मोहन जोशींनी केला होता.या सर्व प्रश्नांना तावडे यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून उत्तर दिले. आतापर्यंतच्या कोणत्याही सांस्कृतिकमंत्र्याच्या एका कार्यकालात एवढे उपक्रम झाले नाहीत. तरीही मोहन जोशी आणि अन्यमंडळींनी केलेली वक्तव्ये साहित्य व संस्कृतीच्या हितासाठी केली असावीत, असे समजून मी संबधितांना भेटून या सर्व विषयांमध्ये कार्यवाही सुरू करतो, अशी भूमिका तावडे यांनी आपल्या निवेदनात मांडली.मोहन जोशी यांनी आपल्याकडे वेळ मागितली आणि आपण त्यांना दिली नाही असे कधीही झाले नाही. जोशी यांना वेळ नाकारण्याइतका काही मी मोठा नाही, अशी कोपरखळीही तावडे यांनी मारली आहे.अलिबाग येथे झालेल्या मराठी नाट्य स्पर्धांच्या पुरस्कार कार्यक्रमाला जोरदार पावसामुळे आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे जाता आले नाही, असे काही अपवाद वगळता आपण स्वत: प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे असा खुलासाही तावडे यांनी केला आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMohan Joshiमोहन जोशीGSTजीएसटी