शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याची ‘सेटिंग’ पडणार महाग!

By admin | Updated: August 18, 2014 03:53 IST

राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक कार्यालयातील विविध विभागांतील कार्यासन अधिकारी, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांना परस्पर भेटण्याला मज्जाव घालण्यात आला आहे

जमीर काझी, मुंबईआपल्याला हव्या त्या ठिकाणी बदलीचा प्रस्ताव, पदोन्नती, हवा तसा विभागीय चौकशी, गोपनीय अहवालातील शेऱ्याबाबत राज्याच्या पोलीस मुख्यालयातून परस्पर होत असलेल्या ‘सेटिंग’ला आता काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक कार्यालयातील विविध विभागांतील कार्यासन अधिकारी, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांना परस्पर भेटण्याला मज्जाव घालण्यात आला आहे. ‘बाबूगिरी’च्या संपर्कात असल्याचे आढळणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दलातील सर्व विभागांतील पोलीसप्रमुखांना त्याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यांच्या या सूचनेमुळे नेहमी ‘शिकारी’च्या शोधात असलेल्या मुख्यालयातील काही मंत्रालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ते वरकमाईचा नवा पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यातील ११ कोटींवर जनतेच्या जीवित व वित्त मालमत्तेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या दोन लाखांवर फौजफाटा असलेल्या पोलिसांच्या सर्व मुख्य बाबी या कुलाब्यातील पोलीस महासंचालक कार्यालय असलेल्या मुख्यालयातून होत आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती, विभागीय चौकशी, मानीव दिनांक, गोपनीय अहवाल यांची कामे या ठिकाणातून होत असल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी आपली फाईल, प्रस्ताव, अर्ज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत ‘व्यवस्थित’पणे जावा, यासाठी संबंधित विभागातील कार्यासन अधिकारी, अधीक्षक व लिपिकांना भेटून ‘सेटिंग’ करतात, त्यांच्याकडून पूरक प्रस्ताव गेल्यानंतर अधिकारीही त्याबाबत फारसा फेरफार न करता मंजुरी दिली जाते. त्याप्रमाणे आपली चौकशी, पुरस्कार, गोपनीय अहवाल, प्रस्तावाची फाईल कुठपर्यंत आली आहे, याची माहिती घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी मुख्यालयातील ‘बाबूं’ना भेटत असतात. हा प्रकार निदर्शनास आल्याने दयाळ यांनी त्याला पायबंद घालण्याचे ठरविले आहे.पोलिसांनी आपल्या अडचणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर भेट घेऊन त्यांच्याकडे मांडाव्यात. परस्पर लिपिक वर्गाला भेटणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. याबाबत सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व विभागप्रमुखांनी आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.