शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 2:44 PM

संजय राऊतांकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक

पुणे: राज्यातल्या भाजपा नेत्यांना वारंवार लक्ष्य करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मात्र स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. सध्या देशात नरेंद्र मोदींच्या तुलनेत कोणताही नेता नसल्याचे कौतुकोद्गार राऊत यांनी काढले. सध्याच्या घडीला मोदी हे देशातले सर्वाधिक लोकप्रिय नेते असून त्यांनी जगात देशाची प्रतिमा निर्माण केली असल्याचं राऊत यांनी म्हटलं. लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपाला लक्ष्य करणाऱ्या संजय राऊत यांनी आजही भाजपाचा समाचार घेतला. मुख्यमंत्रिपदाच्या शब्दावरुन त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीका केली. 'अटलबिहारी वाजपेयी असल्यापासून माझं भाजपावर प्रेम आहे. नेते बदलतात, पिढी बदलते, तसे पक्षात हळूहळू बदल होत जातात,' असं म्हणत राऊत यांनी सध्याच्या भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं.शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर भाजपानं दिलेला शब्द पाळला असता, तर आज राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या सत्तास्थापनेत फारसं लक्ष घातलं असं वाटत नाही, असंदेखील त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. सध्या देशात मोदींइतका लोकप्रिय नेता नाही. त्यांनी जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. पंतप्रधान हा देशाचा असतो, तो कोणत्याही पक्षाचा नसतो, असंदेखील ते पुढे म्हणाले. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही काल पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलं होतं. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावरुन भाजपावर तोफ डागताना मोदींची मात्र स्तुती केली होती. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, अशा शब्दांत मोदींची प्रशंसा करण्यात आली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना