अकोल्यात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: June 8, 2014 23:26 IST2014-06-08T23:25:55+5:302014-06-08T23:26:03+5:30

शिवसेनेचे माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला; रविवारी सायंकाळी घडली घटना.

Ex-city corporator assault in Akola | अकोल्यात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

अकोल्यात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

अकोला - महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यावर किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रविवारी सायंकाळी जुने शहरात घडली. शनिवारी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका युवकास चाकूने भोसकण्यात आले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी माजी नगरसेवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने जुने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जुने शहरामधील परिसरातील रहिवासी गजानन चव्हाण रविवारी सायंकाळी आपल्या घरी असताना त्यांच्या घरासमोर काही युवकांमध्ये वाद सुरू होते. या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्यानंतर माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांनी दोन्ही गटातील युवकांची समजूत काढून हा वाद आपसात मिटविला. त्यानंतर चव्हाण घरी असताना ७ वाजताच्या सुमारास एका टोळीने त्यांच्या घरात घुसून गजानन चव्हाण यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. यामध्ये गजानन चव्हाण यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या शरीरावरही जबर मार लागला आहे. या प्राणघातक हल्लय़ात चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्रथम सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गजानन चव्हाण यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हाताला व पोटावर जबर मार लागला असून, हा हल्ला वानखडे नामक युवकाच्या टोळीने केल्याची प्राथमिक माहिती जुने शहर पोलिसांनी दिली.

Web Title: Ex-city corporator assault in Akola