शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

"जर देवेंद्र फडणवीसांनी खेळी केली तर..."; भाजपा नेत्याचं सूचक विधान, एकनाथ शिंदेंना इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:08 IST

खरेतर भाजपा-शिवसेना महायुतीचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची काही अडचण नव्हती असं दरेकरांनी म्हटलं.

मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेने मनसेचा पाठिंबा घेतला आहे. केडीएमसीत महापौर आणि सत्ता समीकरणे जुळवण्यासाठी शिंदेसेनेने मनसेला सोबत घेत एकप्रकारे भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्यांमधून प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्यात. महायुती म्हणूनच कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन होईल. महायुतीचे वरिष्ठ नेते आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा करून शिंदेंसोबत संवाद साधून त्याठिकाणी महायुतीची सत्ता बसेल असं सांगत एकनाथ शिंदेंच्या खेळीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सूचक विधानही केले आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, भाजपाला अजिबात धक्का मानायचं कारण नाही. शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरोधात असतो परंतु निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी कुणी समर्थन देत असेल आणि पाठिंबा देत असेल तर घेतला जातो. शहराच्या विकासाच्या भूमिकेवर मनसे-शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा भाग बनत असेल तर त्याचे स्वागत आहे. खरेतर भाजपा-शिवसेना महायुतीचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची काही अडचण नव्हती. परंतु शिवसेनेला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना घटक पक्षांना सोबत घ्यायचे असेल तर काही अडचण नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या पक्षातील नेते घ्यायचे नाहीत हे ठरले होते ही वस्तूस्थिती आहे. तथापि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु महायुती अभेद्य असेल. कल्याण डोंबिवलीत जी सत्ता स्थापन होईल ती महायुती म्हणूनच असेल. भाजपा हा एवढा विशाल पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबाबत कुणी काय बोलू शकत नाही. भाजपा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांच्या खेळी, डावपेच हे भाजपासाठी दुय्यम ठरतात. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी जर खेळी केली तर काय होते महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांना ज्यांनी राजकीय दृष्ट्‍या चित केले तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार? असा इशाराच अप्रत्यक्षपणे प्रविण दरेकर यांनी शिंदेसेनेला दिला. 

दरम्यान, महायुती म्हणून आम्ही मनसेला सोबत घेतले नाही. शिवसेनेने मनसेला सोबत घेतले आहे. शेवटी घटक पक्ष वाढवणे हा शिवसेनेचा अधिकार आहे परंतु महायुती म्हणून सत्तास्थापनेचा निर्णय रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनासाठी एकनाथ शिंदेंसोबत संवाद साधून करतील तोच निर्णय अंतिम असेल असं दरेकरांनी स्पष्ट सांगितले. 

उद्धव ठाकरेंवर लोकांचा विश्वास नाही

जसा राजा तशी प्रजा..उद्धव ठाकरे जसे लोकांसाठी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी नॉट रिचेबल राहतात तसे आता नगरसेवकांची पाळी आली. आता उद्धव ठाकरेंवर लोकांचा विश्वास राहिला नाही. विकासाबाबत त्यांच्याकडून काय होईल याचा भरवसा नाही. त्यामुळे विकासाच्या बाजूने जो मतदारांसमोर गेलेला असतो त्यामुळे अशा गोष्टी त्यातूनच घडत असतात असं सांगत दरेकरांनी नॉट रिचेबल नगरसेवकांवर भाष्य केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis's move could change things: BJP leader hints at Shinde.

Web Summary : BJP leader Darekar hinted at a potential power play by Fadnavis amidst Shinde Sena's alliance with MNS in Kalyan Dombivli. He emphasized the MahaYuti's strength, while acknowledging Sena's right to expand, but stressed that Fadnavis's decision would be final regarding power-sharing.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MNSमनसेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकर