शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रेल्वेने दिली वारक-यांना प्रवास सवलत

By admin | Updated: July 24, 2015 00:43 IST

विठ्ठल दर्शन एक्सप्रेस प्रवासात ज्येष्ठ नागरीक व महिलांना मिळणार लाभ.

खामगाव : खामगाव व अमरावती येथून आषाढ वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूर येथे जाणार्‍या विठ्ठल दर्शन एक्स प्रेसमध्ये गेल्या १२ वर्षापासून दिली जाणारी ज्येष्ठ महिला व बालकांना ५0 टक्के तर ज्येष्ठ पुरुषांना ३0 टक्के प्रवास भाडे सवलत यावर्षी रेल्वेने नाकारली होती. ह्यलोकमतह्णने या मुद्याचा प्रभावी पाठपुरावा केल्यानंतर तिसर्‍या फेरीपासून रेल्वेने विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये या सवलती अखेर लागू केल्या.रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. ज्येष्ठ पुरुषांना ३0 टक्के, तसेच ज्येष्ठ महिला आणि १८ वर्षाखालील बालकांना ५0 टक्के सवलत दिली जाते. गेल्या १२ वर्षांंंंंंपासून खामगाव व अमरावती येथून निघणार्‍या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये ही नियमीत सवलतही नाकारण्यात आली होती. लोकमतने हा मुद्दा प्रभावीपणे रेटून धरल्यानंतर विविध संघटना आणि मान्यवर रस्त्यावर आले. खामगाव येथील रेल्वे स्थानकावर १७ जुलै रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. याशिवाय खा. प्रतापराव जाधव यांनीही रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून प्रवास सवलती लागू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. एवढेच काय, मारवाडी युवा मंचने भाड्यातील तफावतीची रक्कम वारकर्‍यांना देण्याचे जाहीर केले होते. या आंदोलनांची दखल घेत अखेर रेल्वेने श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये ज्येष्ठ पुरुषांना ३0 टक्के, तर ज्येष्ठ महिला व बालकांना ५0 टक्के सवलत प्रवास भाड्यामध्ये देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश खामगाव रेल्वे स् थानकास प्राप्त झाले असून, २४ जुलै रोजी निघणार्‍या तिसर्‍या फेरीपासून तो लागू होणार आहे.