शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:41 IST

Rohit Pawar Ladki Bahin Yojana: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून एक शासन आदेश दाखवत गंभीर आरोप केला आहे. रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवरही पलटवार केला. 

Rohit Pawar Ajit Pawar Ladki Bahin Yojana: "आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावल्यानंतर "आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत", असा पलटवार रोहित पवारांनी केला. रोहित पवारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या खात्याने काढलेला शासन निर्णय दाखवला. बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा, असे टीकास्त्र रोहित पवारांनी डागले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आमदार रोहित पवार म्हणाले, "हे सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की, लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा आहे."

जाहिरातींसाठी २०० कोटींचा शासन निर्णय

"१५ ऑगस्ट २०२४ रोजी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी २०० कोटी रुपये खर्चाचा जीआर काढला होता आणि २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत, त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते, परंतु ५ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी ३ कोटींची मान्यता दिली", असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.   

"१५ ऑगस्ट २०२४ रोजच्या जीआरमधील २०० कोटींच्या मर्यादेतीलच ही रक्कम असल्याचे या जीआरमध्ये नमूद असले, तरी २३ नोव्हेंबर २०२३ मधील जीआरमध्ये नमूद संस्थांना काम देण्याऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती आहे", असा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. 

महिला आणि बाल विकास माहिती का लपवत आहे?

"माहिती जनसंपर्क विभाग असताना महिला आणि बाल विकास विभागाने ही कामे का दिली? ज्या कंपन्यांना कामे देण्यात आली, त्या कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कंपन्यांची माहिती मागवली असता महिला बालविकास विभाग यासंदर्भातील माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा", असे सवाल रोहित पवार यांनी महायुती सरकारला केले आहे.

रोहित पवारांनी पोस्टच्या शेवटी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी "टीप-आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत", असे म्हणत अजित पवारांच्या आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत या विधानाला शासन निर्णयाची पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारAditi Tatkareअदिती तटकरेCorruptionभ्रष्टाचार