शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

वगैरे वगैरै... बेडवर बाई पाहून मंत्र्याला फुटला घाम, सुशीलकुमार शिंदेंच्या गौप्यस्फोटाने पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 5:58 PM

देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या नर्मविनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी हसत खेळत ते समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत असतात.

सोलापूर - देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या नर्मविनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी हसत खेळत ते समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत असतात. नुकताच येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदेंनी वगैरे वगैरे या शब्दामुळे एका मंत्र्यासोबत घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित्यांच्याही हसून हसून मुरकुंड्या वळल्या.पत्रकार संजय पाठक यांनी लिहिलेल्या फेटे आणि फटकारे पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या शिंदे यांनी हा किस्सा सांगितला. शिंदे म्हणाले. एक मंत्री जिल्हा दौऱ्यावर निघाले. त्यामुळे मंत्र्यांच्या पीएंनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मंत्र्यांची व्यवस्था करण्यास सांगितले. या पीएंनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात मंत्र्यांच्या आवडीचे जेवणाचे मेनू, झोपताना फळे आणि दुधाची व्यवस्था करा असे नमुद केले तसेच शेवटी वगैरे वगैरे असे लिहून पूर्ण विराम दिला.  पण या वगैरे वगैरेचा जिल्हाधिकारी महोदयांनी मात्र भलताच अर्थ घेतला. नियोजित वेळेत रात्री सदरहू मंत्री शासकीय विश्रामगृहाजवळ पोहोचले. तेथे गप्पा टप्पा झाल्यावर मंत्रिमहोदय झोपण्यासाठी बेडरूमकडे वळले. पण बेडवर पाहतात तर काय बेडवर एक बाई बसलेली. बाईला पाहून या मंत्र्यांना घाम फुटला.  हा काय प्रकार म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. तर कर्तव्यपरायण जिल्हाधिकारी म्हणाले, "तुमच्या मंत्र्यांनीच वगैरै वगैरेची व्यवस्था करायला सांगितले होते. फजिती झालेले हे मंत्रिमहोदय कोण होते. त्यांचा तो उपदव्यापी पीए कोण आणि अतिकर्तव्यपरायणता दाखवणारे ते जिल्हाधिकारी कोण याचा उल्लेख मात्र शिंदेंनी टाळला. मात्र त्यांनी सांगितलेल्या या मिश्किल किश्श्यामुळे संपूर्ण सभागृहाची हसून हसून पुरेवाट झाली.  

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMaharashtraमहाराष्ट्र